वर्षाच्या बाराही महिने बाजारात काकडी उपलब्ध असते. काकडीमध्ये ९० टक्के पाणी असते, ज्यामुळे शरीर हायड्रेट आणि निरोगी राहते. शरीरातील पाण्याची पातळी कायमच नियंत्रणात ठेवण्यासाठी काकडीचे सेवन करावे. काकडी खाल्ल्यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होते आणि शरीर थंड राहते. पण काहींच्या आरोग्यासाठी काकडी घातक ठरू शकते. काकडीच्या सेवनामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी काकडी खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (फोटो सौजन्य – istock)
'या' व्यक्तींनी रोजच्या आहारात चुकूनही करू नका काकडीचे सेवन, तब्येत सुधारण्याऐवजी आणखीनच जाईल बिघडून

रोजच्या आहारात नेहमीच काकडी खाल्ल्यास पोट फुगणे किंवा पोटाच्या इतर समस्या उद्भवू शकतात. पोटात गॅस तयार होऊन सतत जडपणा जाणवू शकतो.

पचनसंस्था कमकुवत किंवा संवेदनशील असलेल्या लोकांनी काकडी खाऊ नये. कारण यामध्ये असलेल्या फायबरमुळे पोटात वेदना होणे, पेटके किंवा ऍसिडिटी होऊ शकते.

रात्रीच्या जेवणात काकडी खाऊ नये. दुपारी किंवा सॅलड म्हणून तुम्ही काकडीचे सेवन करू शकता. काकडीमध्ये असलेल्या पाण्याच्या प्रमाणामुळे वारंवार शौचालयात जाण्याची वेळ येऊ शकते.

सर्दी, खोकला, कफ किंवा सायनस यांसाख्या आजारांपासून त्रस्त असलेल्या लोकांनी अजिबात काकडी खाऊ नये. काकडी अतिशय थंड असते, ज्यामुळे लगेच सर्दी होण्याची शक्यता असते.

काकडी खाल्ल्यामुळे काहींच्या तोंडात तर काहींच्या जिभेला खाज सुटते. ही ओरल ऍलर्जी सिंड्रोमची गंभीर लक्षणे आहेत. त्यामुळे काकडीचे सेवन अजिबात करू नये.






