शरीरासाठी कॅल्शियम अतिशय महत्वाचे आहे. हाडे कायमच निरोगी राहतात. पण बऱ्याचदा आहारात होणाऱ्या बदलांमुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असते. शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर हाडांमध्ये वाढलेल्या वेदना, ऑस्टियोपोरोसिस किंवा संधिवातासारख्या गंभीर समस्या उद्भवू लागतात. म्हणून नेहमी एक ग्लास दुधाचे सेवन करावे. पण आपल्यातील अनेकांना दूध पिणे अजिबात आवडत नाही. अशावेळी तुम्ही या पेयांचे सेवन करू शकता. यामुळे शरीरात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता भरून निघेल आणि तुम्ही निरोगी राहाल. (फोटो सौजन्य – istock)
Calcium ची कमतरता भरून काढतील 'ही' गुणकारी पेय
सोया दुधामध्ये नैसर्गिक कॅल्शियम असते. त्यामुळे तुम्ही नियमित एक ग्लास सोया दूध पिऊ शकता.एक कप सोया दुधामध्ये सुमारे 300 मिलीग्राम कॅल्शियम असते. याशिवाय यामध्ये प्रोटीन आढळून येते.
कॅल्शियमने समृद्ध असलेले बदाम शरीरासाठी आवश्यक आहे. कारण यामध्ये फोर्टिफाइड बदामाच्या दुधात प्रत्येक कपमध्ये ४५० मिलीग्राम पर्यंत कॅल्शियम असते. यामुळे शरीरात कमी कॅलरीज बर्न होतात.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं संत्र्याचा रस प्यायला खूप जास्त आवडतो. या रसात असलेले विटामिन सी, कॅल्शियम आणि इतरही आवश्यक घटक शरीरासह त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात.
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आहारात नियमित ताक प्यायले जाते. ताक प्यायल्यामुळे पोटात थंडावा राहतो. तसेच एक ग्लास ताकामध्ये ३०० मिलिग्रॅम कॅल्शियम आढळून येते.
कॅल्शियमचा उत्तम स्रोत म्हणजे तिळाचे दूध. तिळाचे दूध प्यायल्यामुळे शरीराला आवश्यक कॅल्शियम मिळते. यासोबतच शरीरात कायम ऊर्जा टिकून राहते.