Most Dangerous Plant In The World: जगात अनेक औषधी वनस्पती आहेत, ज्या आपल्या आरोग्यासाठी फायद्याच्या ठरत असतात. अशातच काही अशा वनस्पतीही आहेत, ज्या आपल्या जीवासाठी घातक ठरु शकतात. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात धोकादायक वनस्पतीविषयी माहिती सांगत आहोत, जिला स्पर्श करताच तुम्ही मृत्यूला बळी पडाल. मुळातच या वनस्पतीला जर कोणी स्पर्श केला तर प्रचंड वेदना जाणवतात, ज्या त्याला मरण्यास भाग पाडतात. या वनस्पतीला स्पर्श करण्याचे धाडस कुणीही करत नाही...
विषाहून धोकादायक आहे हे रोपटं, हात लावताच मृत्यूला बळी पडाल; चुकूनही स्पर्श करू नका
जगातील सर्वात धोकादायत ठरणाऱ्या या वनस्पतीचे नाव जिम्पी-जिम्पी असे आहे. ही वनस्पती ऑस्ट्रेलियाच्या घनदाट जंगलात, इंडोनशियात आणि मोलुकसच्या काही भागांत आढळून येते
ही वनस्पती दिसायला सामान्य रोपटांप्रमाणेच हिरवीगार दिसून येते मात्र यातील भयानक विष या झुडुपाला प्रचंड धोकादायक बनवते. हेच कारण आहे की, या झुडुपाला सुसाइड प्लांट, स्टिंगिंग ब्रश, जिम्पाई स्टिंगर आणि मूनलाईटर अशी नावे देण्यात आली आहेत
या वनस्पतीच्या काठाशी टोकदार काटे दिसून येतात जे जिम्पाईची खासियत आहे. त्याचे काटे नाजूक आणि बारीक असतात. या काट्यांमध्ये न्यूरोटाॅक्सिन नावाचा विषारी पदार्थ आढळून येतो
मरीना हर्ले नावाच्या एका शास्त्राज्ञाने या वनस्पतीवर संशोधन करत असल्याते सांगितले. यावेळी तिने वनस्पतीसोबतचा आपला अनुभव शेअर करताना सांगितले की, वनस्पतीला स्पर्श करताच तिच्या शरीरीवर आम्ल पडले. इतकेच काय तर तिला विजेचा धक्का बसल्याचेही जाणवले
चुकून जर तुम्ही या वनस्पतील स्पर्श केला तर तुम्हाला याचे गंभीर परीणाम भोगावे लागू शकतात. याचा त्रास कमी करण्यासाठी रुग्णालयतही दाखल होण्याची वेळ येऊ शकते
या वनस्पतीमुळे होणारा त्रास इतका भयानक असतो की याला स्पर्श करताच लोक आत्महत्या देखील करु पाहतात. म्हणूनच त्याला सुसाइड प्लांड असे म्हटले जाते