फोटो सौजन्य: Gemini
देशातील आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपन्यांपैकी एक असलेल्या मारुती सुझुकीने अनेक सेगमेंटमध्ये दमदार वाहने ऑफर केली आहेत. कंपनी कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये मारुती डिझायर ऑफर करते. ही मारुती सेडान 2025 पासून देशातील सर्वात लोकप्रिय कार आहे. गेल्या वर्षी या कारच्या एकूण 2.4 लाख युनिट्स विकल्या गेल्या.
Grand Vitara आणि Hyryder चे वर्चस्व संपुष्टात? ‘ही’ ठरतेय देशातील सर्वात स्वस्त Hybrid SUV
Hyundai कंपनीकडून भारतात विविध सेगमेंटमध्ये वाहनांची विक्री केली जाते. मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये Hyundai Creta उपलब्ध आहे. 2025 दरम्यान या SUV ला देशभरात मोठी पसंती मिळाली. मागील वर्षी या SUV च्या 2.01 लाख युनिट्सची विक्री झाली आहे.
Tata Motors कडून कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये Tata Nexon ऑफर केली जाते. 2025 मध्ये या SUV चीही मोठ्या प्रमाणावर विक्री झाली होती. उपलब्ध माहितीनुसार, संपूर्ण वर्षात या SUV च्या 2.01 लाख युनिट्सची विक्री झाली आहे.
HSRP साठी नवा कंत्राटदार; मुदतवाढ नसली तरी कारवाईपासून वाहनधारकांना दिलासा
Maruti कडून हॅचबॅक सेगमेंटमध्ये Wagon R विकली जाते. ही कार भारतीय बाजारात दीर्घकाळापासून उपलब्ध आहे आणि आजही भारतीय ग्राहकांची पसंती टिकवून आहे. माहितीनुसार, 2025 मध्ये देशभरात या कारच्या 1.94 लाख युनिट्सची विक्री झाली आहे.
Maruti कडून बजेट MPV सेगमेंटमध्ये Ertiga ऑफर केली जाते. ही कार देखील भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणावर पसंत केली जाते. अहवालांनुसार, मागील वर्षी या बजेट MPV च्या 1.92 लाख युनिट्सची विक्री झाली आहे.






