निरोगी आरोग्यासाठी शरीरात सर्वच विटामिनची पातळी योग्य असणे आवश्यक असत. कारण शरीरात कोणत्याही एका विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचते. शरीरात लोहाची कमतरता निर्माण झाल्यानंतर सतत थकवा, अशक्तपणा, विकनेस इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. याशिवाय रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात कोणत्या लोहयुक्त पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा 'या' लोहयुक्त पेयांचे सेवन
रोजच्या आहारात नियमित आवळा आणि कोरफडीच्या रसाचे सेवन करावे. या रसामध्ये असलेले गुणधर्म शरीरातील उष्णता कमी करून शरीरात थंडावा निर्माण करतात.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटक आढळून येतात, ज्यामुळे लोहाची कमतरता दूर होते. यासोबतच शरीरात निर्माण झालेला थकवा आणि अशक्तपणा कमी होतो. त्वचेसाठी विटामिन सी अतिशय गुणकारी आहे.
भिजवलेले मूग आणि हरभऱ्याच्या डाळीचा वापर करून बनवलेली स्मूदी चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. यामध्ये असलेले घटक शरीराला आवश्यक पोषण देतात.
नियमित एक डाळिंब खाल्यामुळे शरीरात रक्त वाढते. यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळून येते. त्यामुळे शरीरात लोहाची कमतरता निर्माण झाल्यानंतर डाळिंबाच्या रसाचे सेवन करावे.
बीटरूट मध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळून येते. याशिवाय फोलेट, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे रोजच्या आहारात नियमित बीटच्या रसाचे सेवन करावे.