भारताच्या फेमस आणि लोकप्रिय खाद्यपदार्थांमध्ये वडापावचे नाव प्रामुख्याने येते पण वडापाव कुठला खायचा असा प्रश्न आला की सर्वात आधी मुंबईचे नाव येते. आणि मुंबई म्हटलं की वडापावचं नाव आपसुकचं येतं... मुंबईत जो कोणी येतो तो वडापाव खाल्ल्याशिवाय इथून घरी परतत नाही. वडापाव कितीही फेमस असला तरी त्याची चव प्रत्येक अप्रतिम मिळतेच असं नाही. आज आम्ही तुम्हाला मुंबईतील असे काही फेमस स्पॉट सांगणार आहोत जिथे तुम्हाला अप्रतिम आणि स्वादिष्ट वडापावची चव चाखायला मिळू शकते.
मुंबईतले टॉप 5 वडापाव; झणझणीत चव अन् हे नाही खाल्लं तर काय केलं...
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून काही मीटरवर असलेला आराम वडापाव मुंबईची शान आहे. इथे वडापाव खाण्यासाठी लोकांची मोठी लांब रांग लागते. यांची झणझणीत चटणी आणि वाड्याची चव या वडापावला खास बनवते
यादीतील दुसरं आणि मुंबईतील सुप्रसिद्ध वडापाव म्हणजे अशोक वडापाव. प्रभादेवीमधील किर्ती कॉलेज जवळील हा वडापाव 38 वर्षांहून अधिक काळापासून इथे विकला जात आहे. याची खासियत म्हणजे हा वडापाव चुऱ्यासोबत दिला जातो जो ज्यामुळे याची चव आणखीन मजेदार लागते. अनेक सेलिब्रिटींनीही या वडापावची चव चाखली आहे.
भांडूपमधील भाऊ वडापाव त्याच्या मोठ्या साइझच्या वड्यासाठी आणि त्यासह दिलेल्या कांद्यासाठी फेमस आहे. याची चव इतकी पोटभरणीची आहे की तिला चाखताच लोक या वडापावचे फॅन होतात
ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला मिळणारा कुंजविहार वडापाव त्याच्या खास चटणीसाठी लोकप्रिय आहे. मुंबईत या वडापावच्या अनेक शाखा आहेत
ठाण्यातच वसलेला गजानन वडापाव आपल्या खास चटणीसाठी खास करून ओळखला जातो. हा वडापाव मिरचीचा खर्डा आणि बेसनाच्या चटणीसह हा सर्व्ह केला जातो