विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सध्या अमित ठाकरे यांची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे. अमित ठाकरे यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र त्यांच्याविरोधामध्ये अनेक बड्या नेत्यांचे आव्हान असणार आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष सुद्धा पुतण्या अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देणार आहेत. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Uddhav Thackeray will announce candidate from Mahim constituency against Amit Thackeray
ठाकरे परिवारातील लोकप्रिय काका-पुतण्याची जोडी म्हणजे हिंदूह्द्यसम्राट बाळासाहेब ठाकरे व राज ठाकरे यांची अत्यंत गाजलेली जोडी आहे.
राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहिम विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.
मागील 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले होते. यावेळी राज ठाकरे यांनी काका-पुतण्या हे नाते निभावले होते, आणि पहिल्यांदा आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नव्हता.
आता मात्र अमित ठाकरे यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांचा गट हा उमेदवारी देण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी निभावलेले नाते आता उद्धव ठाकरे निभावणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
उद्धव ठाकरे यांच्याकडून माहिम विधानसभा मतदारसंघातून महेश सावंत यांना उमेदवारी देणे जवळपास निश्चित झालं आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा देऊन देखील महायुतीने अमित ठाकरेंविरोधात उमेदवार जाहीर केला आहे.