भारताचा स्टार विराट कोहली आज त्याचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याला सोशल मीडियावर भरभरून चाहचे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. विराट कोहलीने भारतीय क्रिकेटसाठी मोठी कामगिरी केली आहे. टीम इंडियाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली होती. विराट कोहलीला त्याच्या मजबूत फिटनेस, क्रिकेटची आवड आणि अप्रतिम प्रतिभा यामुळे जागतिक स्टार म्हटले जाते. किंग कोहलीचे जगभरात चाहते आहेत. त्याच्या दमदार फलंदाजीचे सर्वजण कौतुक करतात. किंग कोहलीने अनेकवेळा अशी कामगिरी केली आहे की त्याच्या टीकाकारांनाही त्याचे कौतुक करायला भाग पाडले आहे. येथे जाणून घ्या किंग कोहलीच्या पाच सर्वोत्तम खेळी.
विराट कोहलीने त्याच्या क्रिकेट करियरमध्ये केलेल्या सर्वात्तम खेळी. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
2012 च्या आशिया चषकात युवा कोहलीने आपल्या शानदार फलंदाजीने संपूर्ण जगात आपले नाव कमावले होते. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या किंग कोहलीने 183 धावांची नाबाद खेळी करत पाकिस्तानने दिलेले मोठे लक्ष्य पार केले. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
2012 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कॉमनवेल्थ बँक मालिकेत विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यात टी-20 सारखी फलंदाजी करून सर्वांना आपले फॅन बनवले होते. या सामन्यात विराटने अवघ्या 86 चेंडूत 133 धावांची नाबाद मॅचविनिंग इनिंग खेळली आणि टीम इंडियाला अंतिम फेरीत नेलं. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
2018 मध्ये इंग्लंड दौऱ्यामध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांनी कहर केला होता त्यावेळी पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने 149 धावांची शानदार खेळी केली होती. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
2016 च्या T20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात किंग कोहलीने केवळ 51 चेंडूत 82 धावांची नाबाद खेळी खेळली होती. विराटच्या या खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा सहज पराभव केला. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
विराट कोहलीने 2022 च्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध हरवलेला सामना जिंकून इतिहासात आपले नाव नोंदवले होते. या सामन्यात विराटने 82 धावांची शानदार खेळी केली. फोटो सौजन्य - सोशल मीडिया