कोकणात अनेक कथा प्रसिद्ध आहेत. यातील बहुतेक कथा या भयंकर आहेत. अनेक वेळा मुंबईची पाहुनी मंडळी कोकणात गावी सुट्ट्यांमध्ये जातात. गावाला शहर समजून मध्यरात्री रानावनात फिरत बसतात. पण त्यांना गावातील आणि शहरातील रात्र यामधील फरक माहीत नसतो. त्यामुळे ते फसतात आणि स्वतःच्या पायावर दगड मारून बसतात. कोकणातील 'छबिना' हा प्रकार माहिती आहे का?
'छबिना' किंवा 'सबेना' म्हणजे काय? जाणून घ्या. (फोटो सौजन्य - Social Media)
मध्यरात्रीच्या सुमारास 'छबिना' किंवा 'सबेना' हा भुताटकीच्या प्रकार बाहेर निघतो. हा प्रकार इतर प्रकारांपेक्षा अधिक भयानक आहे. कारण यात एक भूत नाही तर शेकडो भूत समोर जाताना दिसतात.
जर तुम्ही रात्रीच्या अंधारात रानात गेलात आणि समोरून जोरजोरात बाजा वाजवताना आणि एक उत्साहाचा आक्रोश येताना दिसला तर काय आहे? हे उत्साहाने पाहत बसू नका.
मुळात, तो 'छबिना' असतो. माणसांचा नव्हे तर भुतांचा! शेकडो भुतं समोरून नाचत-गात येताना दिसतात. भुतं, पिशाच, जीन, ब्रह्मराक्षस, गिर्हा तसेच भुतांचे अनेक प्रकार आणि शेकडो भुतांची गर्दी या वरातीत दिसते.
कुणाला मान नसते, तर कुणाला धड, कुणाच्या अंगावर वार केलेले असतात तर कुणी कालभिन्न असते. काळाकुट्ट अंधारात दिवट्या मशालींच्या प्रकाश इतका होतो की तेवढा भूभाग दिवसच वाटायला लागतो. पण त्या प्रकाशात पण भीतीच असते.
त्या वरातीत मधोमध वेताळाची पालखी असते. कोकणात 'छबिना किंवा सबेना' या भुताटकीच्या प्रकारच्या अनेक गोष्टी ऐकायला मिळतात.