रणवीर सिंग आणि अक्षय खन्नाचा 'धुरंधर' हा चित्रपट सध्या जगभर गाजत आहे. चित्रपटातील अनेक सीन्स आणि गाण्यांनी लोकांनी वेड केलं. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने भरपूर कमाई केली. चित्रपटाची कथा आणि दमदार अॅक्शन व्यतिरिक्त, लोकांना चित्रपटातील एक गाणं फारचं भाळलं आणि सर्वांनीच त्यावर रिल्स बनवायला सुरुवात केली. हे बहुचर्चित गाणं म्हणजे "FA9LA".
'FA9LA' चा खरा अर्थ माहित आहे का?

धुरंधर चित्रपटातील "FA9LA" हे एक अरबी गाणं आहे. सध्या सोशल मिडियावर प्रत्येकाच्या फिडवर हे गाणं दिसून येत आहे.

गाण्याचे बोल अनेकांना ठाऊक नसले तरी प्रत्येकजण याला गाण्याचा प्रयत्न करत आहे. तर चला या गाण्याच्या ओळी आणि याचा अर्थ जाणून घेऊया.

FA9LA हे गाणं बहरीनचा रॅपर हुसम असीम ज्याला Flipperachi असेही म्हटले जाते, याने गायले आहे. गाण्यात खलिजी हिप-हाॅप आणि आधुनिक बीट्सचा वापर करण्यात आला आहे.

गाण्याचा बोल आहेत - "याखी दूस दूस 3इंडी खोश फासला...याखी तफूज तफूज वल्लाह खोश रक्षा... 3इंडी लक रक्सा काविया या अल-हबीब... इस्माहा साबुहा खतभा नसीब...मिड याक झिंक बटा३तिहा कफा... वा हेज जितफिक 7eel Khallik Shadid

गाण्याचा अर्थ आहे - भाऊ, जोरात नाच, मी खूप मजा करण्याच्या मूडमध्ये आहे... भाऊ, बाजूला हो, देवाची शपथ, चला छान नाच करूया... माझ्या मित्रा, तुझ्यासाठी एक छान डान्स स्टेप आहे... तिचे नाव साबुहा आहे, नियतीने ते फक्त तुझ्यासाठी लिहिले आहे... तुमचे हात वर करा आणि तालावर चालवा... तुमचे खांदे जोरात हलवा, खंबीर राहा.






