देश विदेशातील अनेक पर्यटक लेह लडाखमध्ये फिरण्यासाठी जातात. ले लडाखच्या प्रवासादरम्यान तिथे असलेले तिबेटी झेंडे सगळ्यांचं पाहायला मिळतात. लडाखच्या उंच पर्वत रागांमध्ये हे झेंडे लावण्यात आले आहेत. हे प्रार्थना झेंडे केवळ शोभेसाठी आणि प्रार्थनेसाठी नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लेह लडाखच्या प्रवासादरम्यान दिसणाऱ्या प्रार्थना झेंड्यांचा नेमका काय अर्थ आहे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. लेह लडाखमध्ये गेल्यानंतर सगळीकडे तुम्हाला तिबेटी प्रार्थना झेंडे पाहायला मिळतील. (फोटो सौजन्य – istock)
लेह-लडाखमधील प्रवासादरम्यान दिसणाऱ्या तिबेटी प्रार्थना झेंड्यांमधील पाच रंगांचा नेमकं अर्थ काय?
लेह लडाखमधील तिबेटी झेंडे आकाश, वारा, अग्नी, पाणी आणि पृथ्वीचे प्रतीक असे पृथ्वीचे पाच प्रतीक आहेत. झेंड्यामधील प्रत्येक रंग सकारात्मक ऊर्जा, शांतता आणि सौख्य पसरवतो. तसेच प्रत्येक झेंड्यामध्ये असलेला मंत्रांचा आशीर्वाद सगळ्यांचं मिळतो.
तिबेटी झेंडे धर्म, निसर्ग आणि आध्यात्माचा अनोखा संगम आहेत. नीळा रंग आकाशाचे, पांढरा वाऱ्याचे, लाल अग्नीचे, हिरवा पाण्याचे आणि पिवळा पृथ्वीचे प्रतीक मानले जाते. हे झेंडे वाऱ्यासोबत सगळीकडे पवित्रता पसरवतात.
लेह लडाखच्या कोणत्याही दिशेला गेल्यानंतर तुम्हाला सगळीकडे तिबेटी प्रार्थना झेंडे पाहायला मिळतील. हे झेंडे प्रत्येक व्यक्तीला काही खास संदेश देतात. शांतता ही मिळवण्याची गोष्ट नाही, तर ती मिळवावी लागते.
तिबेटी झेंड्यांवर नेमकी कोणती भाषा लिहिली आहे, हे बऱ्याचदा समजत नाही. या झेंड्यांवर 'ओम मणि पद्मे हम' असे लिहिण्यात आले आहे. ओम हा अतिशय पवित्र शब्द आहे. तर मणि म्हणजे रत्न आणि पद्मे म्हणजे कमळ, तर हम म्हणजे ज्ञानाने भरलेला आत्मा.
लेह लडाखमधील लोक तिबेटी झेंड्याला अतिशय पवित्र मानतात. हा झेंडा कचऱ्याच्या डब्यात, खाली किंवा चुकीच्या ठिकाणी ठेवण्यास मनाई आहे.