ठाणे जिल्ह्यातील असलेल्या खाडीवर महाराजांनी मराठ्यांच्या आरमाची मुहुर्तमेढ रोवली, कोणता होता हा किल्ला जाणून घ्या..
भविष्यात शत्रु जमिनीप्रमाणे पाण्यातूनही युद्ध करेल ही दूरदृष्टी महाराजांनी वेळीच ओळखली होती. म्हणूनच कोकणप्रांतावर मराठ्यांची सत्ता आणि विशेषत: गनिमांच्या हलाचालींवर वचक राहावा .यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली.
किल्ले सिंधुदुर्ग: गोवा आणि तळकोकणात पोर्तुगीजांचं वर्चस्व वाढत जाऊन स्वराज्यासं डोईजड होत होतं. पोर्तुगीजांच्या कुरघोड्यांवर वचक राहावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या कुरटे बेटावर किल्ले सिंधुदुर्ग किल्ल्याची स्थापना केली. या किल्ले बांधणीची जबाबदारी हिरोजी इंदुलकरांना 1664 मध्ये सोपवण्यात आली. किल्ले बांधणीला सुमारे तीन वर्षांचा कालावधी लागल्याचं म्हटलं जातं.
किल्ले विजयदुर्ग : शिलाहार घराण्याचा राजा भोज याने इ.स.1195 मध्ये घेरीया किल्याची स्थापना केली. हा किल्ला पुढे आदिलशाहीत गेला. देवगडच्या समुद्रात असलेला हा किल्ला आदीलशाहीकडून मिळवत महारांजांनी विजय मिळवला म्हणून हा किल्ला पुढे जाऊन विजयदुर्ग नावाने ओळखला जाऊ लागला.
पद्मदुर्ग : या किल्ल्याला कांसा दुर्ग म्हणून देखील ओळखलं जातं. हा किल्ला कमळाच्या पाकळीच्या आकाराचा दिसतो. जंजिरा स्वराज्यात यावा यासाठी शिवरायांनी प्रयत्न करुनही यश हाती आलं नाही. मात्र जंजिऱ्याचा सिद्धीवर करडी नजर राखण्यासाठी महाराजांनी कांसा बेटावर पद्मदुर्ग किल्ल्याची उभारणी केली.
किल्ले दुर्गाडी: स्वराज्याच्या आरमाराची सुरुवात झाली ते किल्ले दुर्गाडीपासून. कल्याण भिवंडी परिसरातील हा किल्ला शिवकालात मराठ्यांची चौकी म्हणून ओळखली जात. सातवाहनाच्या काळात व्यापाऱ्याचं केंद्र होतं. चौकीमुळे मुंबईचे इंग्रज, वसईचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याच्या सिद्धी यांच्या वचक ठेवणं मराठ्यांना सोयीचं झालं होतं.