हिंदू परंपरेनुसार लग्नाच्या दिवशी नवरा नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. मंगळसूत्र या दागिन्याला हिंदू संस्कृतीमध्ये विशेष महत्व आहे. मंगळसूत्रामध्ये दोन सोन्याच्या वाट्या आणि काळे मणी असतात. काळ्या मण्यांची गुंफण करून तयार केलेले मंगळसूत्र लग्नाच्या दिवशी गळ्यात घातले जाते. लग्नात मंगळसूत्र घातल्यामुळे महिला नेहमीच आनंदी असतात. मात्र मंगळसूत्रामध्ये काळे मणी का असतात?असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल ना. चला तर जाणून घ्या यामागील प्रमुख कारण. (फोटो सौजन्य – pinterest)
मंगळसूत्रात काळे मणीच का घातले जातात?
मंगळसूत्रामधील काळे मणी वाईट नजरेपासून आणि नकारात्मक ऊर्जेपासून शरीराचा बचाव करतात. त्यामुळे लग्न झालेल्या महिल्यांच्या गळ्यात नेहमीच सोन्याचे मंगळसूत्र असते.
काळे मणी भगवान शिव आणि देवी शक्तीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे हिंदू संस्कृतीत दैवी जोडीचे प्रतिनिधित्व करतात.
मंगळसूत्रातील काळे मणी विवाहित जोडप्याचे बंधन आणि नाते आणखीन मजबूत करते. याशिवाय त्यांच्यातील सुसंवाद आणि स्थिरता टिकवून राहण्यास मदत होते.
मंगळसूत्रात असलेले काळे मणी, विवाहित स्त्रीला तिच्या वैवाहिक जीवनात शक्ती आणि संरक्षण मिळवून देण्यास फायदेशीर ठरतात. लग्न झालेल्या मुलींच्या गळ्यात काळ्या मण्यांचे मंगळसूत्र असते.
काळे मणी नवीन संसारात आलेले अडथळे किंवा इतर समस्या दूर करतात, असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, काळे मणी राहू ग्रहाचे दुष्परिणाम कमी करण्यास मदत करतात.