देशात केळी, संत्री, जांभूळ अशा अनेक फळांचे सेवन केले जाते मात्र तरीही आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. असे का आणि आंब्यालाच फळांचा राजा का म्हटले जाते याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? आम्ही तुम्हाला सांगतो की यामागे अनेक कारणे आहेत. देशात सर्वाधिक प्रमाणात आंब्याची लागवड केली जाते आणि भारतीय आंब्यांना जगभरात भरपूर मागणी आहे.
केळी आणि संत्र्याला मागे टाकत आंबा कसा बनला फळांचा राजा? ही आहेत प्रमुख कारणे
आंबा हा फक्त त्याच्या चवीसाठी ओळखला जात नाही तर त्यात आरोग्यासाठी आवश्यक असलेले अनेक जीवनसत्वे आणि संयुगे देखील असतात. त्यात व्हिटॅमिन ए, बी, सी, ई, के, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते
आंब्यामध्ये इतर फळांपेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट्स असतात. त्याच्या फायद्यांमुळे त्याला फळांचा राजा म्हटल्याचे सांगितले जाते
भारत देश आंबा उत्पादनात जगात आघाडीवर आहे. २६.३ मेट्रीक आंब्याच्या उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर इंडोनिशिया आहे. जगभरात भारतीय आंबा फार लोकप्रिय आहे
आंब्यामध्ये असलेले पोषक घटक आरोग्याच्या अनेक समस्यांशी लढण्यास मदत करतात. हे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर मानले जाते. हे कोलेस्ट्राॅल कमी करण्यासही मदत करते
भारतीय आंब्याची निर्यात फार मोठ्या प्रमाणात होत असून अनेक दशकांपासून यात वाढ होत आहे. याचा थेट परीणाम देशाच्या अर्थव्यवस्थेला होतो. आपल्या याच गुणांमुळे त्याला फळांचा राजा म्हटले जाते