महाभारत कशामुळे घडलं? असा प्रश्न केला तर कुणी म्हणेल कौरवांनी पांडवांना राज्य दिले नाही म्हणून तर कुणी म्हणेल द्रौपदीचा भरसभेत अपमान केल्यामुळे. प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे असेल पण महाभारत घडल्यानांतर व्यासांनी स्वतः धृतराष्ट्रांना दिलेले उत्तर लक्षात घेण्यायोग्य आहे. कारण त्यांनी दिलेल्या उत्तरात पांडव आणि कौरवांचा संबंधच नाही.
महाभारत का घडलं? (फोटो सौजन्य - Social Media)

महाभारत का घडलं? याचे उत्तर धृतराष्ट्रांना हवे होते तेव्हा व्यास त्यांना एक कथा समजावून सांगतात. व्यास म्हणतात की एकदा देवसभा रंगलेली.

विविध लोकांतून देव उपस्थित होते त्यात पृथ्वीही उपस्थित होती. पृथ्वीला एक समस्या होती लोकसंख्येची! तो देवतांकडे तिच्यावर वाढलेला मानवी भार कमी करण्याचे प्रार्थना करते.

त्यावेळी भगवंत विष्णूही तिथे उपस्थित असतात. ते पृथ्वीला वर देतात की ते हे कार्य पूर्ण करण्यासाठी स्वतः अवतार घेतील आणि कौरव दुर्योधनाच्या हस्ते हे कार्य पूर्ण होईल.

मग पांडव आणि कौरव यांच्यात युद्ध झाले. त्यादरम्यान भगवंत विष्णू अवतार श्रीकृष्णही तेथे उपस्थित होते आणि या लढ्यात अब्जांच्या संख्येत लोकं मारली गेली आणि पृथ्वीचा मानवभार कमी झालं.

मुळात, पांडव आणि कौरव फक्त प्यादे होते मुख्य हेतू पृथ्वीवरून मानव जातीचा भार कमी करणे होता. श्रीकृष्णाने या कार्यात स्वतःचे कुळही संपवून टाकले.






