वय वाढल्यानंतर महिलांमध्ये आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. याशिवाय तरुण वयात शरीराची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे हाडे दुखणे, काम करताना अडथळे निर्माण होणे, पचनक्रिया मंदावणे, संधिवात, मासिक पाळीच्या समस्या इत्यादी अनेक जुनाट आजार होण्याची जास्त शक्यता असते. वय वाढल्यानंतर शारीरिक हालचालींसोबतच पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळेल आणि तुम्ही कायमच हेल्दी राहाल. आज आम्ही तुम्हाला वाढत्या वयात महिलांनी कोणत्याही पदार्थांचे आवश्यक सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातील हाडांना भरपूर पोषण मिळेल. (फोटो सौजन्य – istock)
वाढत्या वयात महिलांची तब्येत राहील कायमच ठणठणीत! आहारात करा 'या' सुपरफुड्सचे सेवन

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित एक ग्लास बीटच्या रसाचे सेवन करावे. बीटच्या रसाचे सेवन केल्यामुळे लोहाची कमतरता भरून निघते आणि शरीरात रक्ताची पातळी वाढते.

भिजवलेले ५ किंवा ६ बदाम नियमित खाल्ल्यास शरीरातील हाडे कायमच मजबूत राहतील. बदामामध्ये प्रोटीन्स आणि मॅग्नेशियम आढळून येते, ज्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते.

सकाळच्या नाश्त्यात नियमित ओट्स खाल्ल्यास पचनक्रिया निरोगी राहण्यासोबतच तुम्ही कायम हेल्दी राहाल. ओट्समध्ये प्रोटीन, फायबर, अँटीऑक्सिडंट्स, विटामिन आढळून येतात.

शरीरात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी एक ग्लास दुधाचे सेवन करावे. दुधात तुम्ही हळद किंवा गूळ मिक्स करून पिऊ शकता.

शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉल आणि कॅन्सरच्या पेशींपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी ब्रोकोली खावी. ब्रोकोलीची चव वाढवण्यासाठी त्यात काळीमिरी पावडर सुद्धा टाकावी.






