बेली फॅट अर्थात पोटाची लटकलेली चरबी ही आपले सौंदर्य नक्कीच खराब करते. पण त्यासाठी तुम्ही कोणत्याही जिममध्ये जाण्यापेक्षा घरच्या घरी योगासन करणे अधिक फायदेशीर आणि उत्तम ठरते. पण मग प्रश्न पडतो की कोणते योगा घरी करावे? थुलथुलीत आणि लटकलेली चरबी ही अनेक आजारांनाही निमंत्रण देत असते. योगाच्या मदतीने तुम्ही बेली फॅट कमी करू शकता. कोणते बेस्ट योगासन आहेत ज्यामुळे पोट सपाट होऊ शकते याबाबत योगा इन्स्ट्रक्टर दीक्षा दाभोळकरने सांगितले आहे (फोटो सौजन्य - iStock)
योगासन करणे हा एक उत्तम आयुष्याचा मार्ग आहे. तुम्हाला पोट कमी कऱण्यसाठी काही सोपे योगा प्रकार आम्ही सांगू शकता
बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्ही नौकासन योगाची मदत घेऊ शकता. रोज नौकासन करण्यामुळे बेली फॅट कमी करण्याची समस्या कमी होऊ शकते
नौकासन योग करण्यसाठी सर्वात पहिले पाठीवर झोपा, आता पाय आणि हात एकमेकांसमोर वर करा. योग करताना तुम्हाला पोटावर दबाव जाणवेल. या पोझिशनमध्ये काही काळ तुम्ही पाय होल्ड करा, त्यानंतर नॉर्मल अवस्थेत या
पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही अधोमुख स्वानासन करू शकता. हे योगासन केल्याने पोटावर जमा झालेली चरबी कमी करता येते
हे योगासन करण्यासाठी, चटईवर सरळ उभे रहा. जेव्हा तुम्ही दोन्ही हात वर करता. तुमचे पाय मागे ठेवा आणि हात वरच्या दिशेने हलवा. हे करताना तुम्हाला जमिनीकडे वाकावे लागेल
या दरम्यान, तुमचे पाय मागे आणि हात पुढे असावेत. शरीर धनुष्याच्या आकारात येईल. तुमचे पाय जमिनीवर ठेवा. तुमचे कंबर वरच्या दिशेने ठेवा