(फोटो सौजन्य: Pinterest)
हिवाळ्याचा गारवा जाणवू लागताच बहुतेक लोक स्नो फॉल पाहण्यासाठी हिल स्टेशनवर जाण्याचा बेत आखातात. मात्र, यावेळी हिवाळा थोडा लवकर संपला, त्यामुळे अनेकांना बर्फवृष्टीच्या सुंदर दृश्याचा आनंद लुटता आला नाही, मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, देशात अशीही काही ठिकाणे आहेत जिथे तुम्ही अजूनही बर्फवृष्टीचा आनंद लुटू शकता. अशात तुम्हालाही बर्फवृष्टीचा सुंदर अनुभव अनुभवाचा असेल तर, तर पर्वतांमधील बदलते हवामान तुम्हाला निराश करणार नाही. तुम्ही तुमच्या सुट्ट्यांचे नियोजन करून आपल्या प्रियजनांसह हिमवर्षावाचा आनंद घेऊ शकता.
डोंगराळ भागात हवामानाने पुन्हा एकदा बदल केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक हिल स्टेशनवर बर्फवृष्टीची नोंद झाली असून, त्यामुळे येत्या वीकेंडमध्ये पुन्हा पर्यटकांची गर्दी येथे वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला आज या लेखात अशा काही हिल स्टेशन्सबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्हाला अजूनही बर्फाळ वातावरणाचा आनंद घेता येईल.
फेब्रुवारी संपत आला आणि मार्च सुरू झाला. या हंगामात हिमवर्षाव जवळजवळ संपतो. मात्र, हवामानात अचानक बदल होत असून अनेक ठिकाणी बर्फवृष्टीची नोंद झाली आहे. जर तुम्हाला स्नो फॉलचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही श्रीनगरचा प्लॅन करू शकता. गेल्या मंगळवारपासून श्रीनगर आणि गुलमर्गच्या आजूबाजूच्या सखल भागात बर्फवृष्टी होत आहे. याशिवाय, तुम्ही हिमाचल प्रदेश या डोंगराळ राज्याच्या सहलीची योजना देखील करू शकता. हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पिती, किन्नौर, चंबा येथे मुसळधार बर्फवृष्टी होत आहे. याशिवाय शिमला आणि कुल्लूमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. लाहौल स्पिती किन्नौरमध्ये एवढी बर्फवृष्टी झाली आहे की अनेक रस्ते बंद झाले आहेत. ही हिमवृष्टी आणखी सुरू राहण्याची शक्यता आहे.
Holi 2025: भारतातील एक असे गाव जिथे रंगांनी नाही तर अंगारांनी खेळली जाते होळी
अशाप्रकारे करू शकता ट्रिपची प्लॅनिंग
तुम्हाला तुमच्या मित्रपरिवारासह बाहेर जायचे असेल तर तुम्ही हिल स्टेशनवर बर्फवृष्टी पाहण्याचा प्लॅन करू शकता. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे पर्यटकांसाठी सुंदर दृश्यांची पुरेपूर व्यवस्था करण्यात आली आहे. आपण आठवड्याच्या शेवटी सुट्टीचे नियोजन करू शकता. काही दिवसांच्या ट्रिपची प्लनिंग करून तुम्ही तुमच्या सुट्टीचा मनमुरादपणे आनंद लुटू शकता.