वसमतमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरु झाली आहे (फोटो- सोशल मीडिया)
Local Body Elections 2025: वसमत : राज्य निवडणूक आयोगाने वसमत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, प्रशासनाने निवडणुकीची सर्व तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे. आज (६ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उपविभागीय अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांनी निवडणुकीसंदर्भात सविस्तर माहिती दिली. मतदार यादीनुसार वसमत शहरात एकूण ५९ हजार ८५५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत नागरिकांना प्रथमच भेट नगराध्यक्ष निवडण्याची संधी मिळणार आहे. शहरात एकूण १५ प्रभाग निश्चित करण्यात आले असून प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडले जातील. त्यामुळे एकूण ३० नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे.
या वेळी वसमत नगराध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत महिला उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळणार 5 आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहरात ६८ हजार ८४६ मतदार असून, त्यापैकी ३५ हजार ५५६ पुरुष आणि ३३ हजार २९० महिला मतदार आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मतदान, २ डिसेंबरला ७ नोव्हेंबरला मतदान केंद्रांची यादी
नगर परिषदेची निवडणूक २ डिसेंबर २०२५ रोजी पडणार आहे. १५ प्रभागांसाठी सुमारे ७० ते ७५ मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. मतदान केंद्राची अंतिम ७ नोव्हेबर रोजी प्रसिद्ध होईल, अशी माहिती माने या दिली, प्रशासनाच्या त्यात ६०० मतदारांचे नाव मतदार यादीत दोन वेळा आढळले आहे. हे मतदार केवळ एकदाच मतदान करतील याची खात्री प्रशासन घेणार असून, बोगस मतदान रोखणासाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संभ्रम कायम – अंतिम मतदारयादी आज प्रसिद्ध
दरम्यान, निवडणुकीची अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध होणार असून, अनेक मतदार आणि इच्छुक उमेदवारांमध्ये काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. पत्रकार परिषदेत उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्यासह तहसीलदार शारदा दलवी आणि निवडणूक विभागातील अधिकारी उपस्थित होते, प्रशासनाकडून निवडणुकीची सर्व तयारी जोरात सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
खर्चमर्यादा झाली जाहीर
राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खच मर्यादाही निक्षित केल्या आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी १८ लाख २५ हजार रुपये, तस नगरसेवक उमेदवारांसाठी ३ लाख ३० हजार रुपये इतकी खची मर्यादा ठरविण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व बाबींवर अधिकाऱ्यांकडून करडी नजर ठेवली जाणार आहे.






