फोटो - सोशल मीडिया
आग्रा : आग्रामध्ये मागील दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा फटका वारसास्थळ आणि जागतिक आश्चर्य असलेल्या ताजमहालला देखील बसला आहे. वास्तूच्या आवारामधील बागेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून मुख्य वास्तूला देखील गळती लागली आहे. ताजमहालमधील मुख्य घुमटातून पाणी गळती होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याचे अनेक फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यानंतर आता एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी पृरातत्व विभागावर निशाणा साधला आहे.
असदुद्दीन ओवैसी यांनी एक्स (ट्वीटर) सोशल मीडियावर ताजमहाल बाबत झालेल्या चुकीच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त केला आहे. ओवैसी यांनी आपल्या पोस्टमध्य पुरातत्व विभाग ताजमहलला सावत्र वागणूक देत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी लिहिले आहे की, ताजमहल हे भारतीय संस्कृतीच्या प्रतिकांपैकी एक आहे. भारतीय पुरातत्व विभाग ताजमहल पर्यटनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमवतो. मात्र, त्यांना ताजमहलची योग्य ती देखभाल करता येत नाही. हा तोच भारतीय पुरातत्व विभाग आहे, ज्यांना वक्फ स्मारकं त्यांच्या ताब्यात हवे आहेत. मात्र, ज्या वास्तू आता त्यांच्या ताब्यात आहेत, त्या त्यांना योग्य पद्धतीने सांभाळता येत नाहीत. हे म्हणजे दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्याने पीएचडीसाठी अर्ज करण्यासारखा प्रकार आहे, असा घणाघात असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे.
Archaeological Survey of India earns hundreds of crore from Taj Mahal but this is how it treats one of the biggest symbols of Indian culture. Funnily, the same ASI argues that Waqf monuments should be taken by over by it so that it can maintain them. This is like failing a 10th… https://t.co/j2DfsrwFyB
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) September 14, 2024
ताजमहालच्या मुख्य घुमटातून पाण्याची गळती होत आहे. तसेच परिसरातील बागेमध्ये पूर्ण पाणी साचले आहे. ही पाणी गळती होत असल्याच्या बातमीला पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. याबाबत आग्रा विभागाच्या पुरातत्व खात्यामधील अधीक्षक प्रमुख राजकुमार पाटील यांनी पीटीआयशी बोलताना म्हणाले की, “ताजमहालमध्ये पाण्याची गळती होत असल्याची बातमी खरी आहे. आम्ही मुख्य घुमटाची तपासणी केली असून पावसामुळे ही गळती होत असल्याचे दिसून आले. तसेच ड्रोन कॅमेऱ्याने आम्ही घुमटाची तपासणी केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.