'राज्यातील दिव्यांग युवकांना रोजगार मिळणार'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा (File Photo)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुती विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळवले. यंदाची लढाई ही प्रतिष्ठेची होईल अशी शक्यता वर्तवली जात असताना महायुतीने एकतर्फी विजय मिळवला. निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीसोबत सर्वात मोठा धक्का हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे पक्षाला बसला. मनसेने पराभवानंतर आता जोरदार कामाला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर लवकरच भाजपसोबत युती करणार असल्याची देखील राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. मनसेने देखील विधानसभेमध्ये झालेला दारूण पराभव विसरून पुन्हा एकदा जल्लोषात कामाला लागले आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी मनसे पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व राज ठाकरे यांची बैठक देखील पार पडली. यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपसोबत युती न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच आगामी काळामध्ये युतीचे संकेत देखील दिले आहेत. आगामी काळात मनसे आणि भाजप यांच्या युतीचे स्पष्ट संकेत मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
काय म्हणाले अविनाश जाधव?
मनसे नेते अविनाश जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधताना सूचक वक्तव्य केले आहे. तसेच आगामी काळामध्ये भाजप व मनसे यांची युती होईल असे स्पष्ट संकेत दिले आहेत. अविनाश जाधव म्हणाले की, “विधानसभेला आम्ही एकटे लढलो. तीन-तीन पक्ष आमच्या विरोधात लढले. 30, 40, 70 हजार मतदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभा निवडणुकीला एकट्या मनसेला मिळाले होते. तीन पक्ष मिळून भेटले आहेत”, असे विधान अविनाश जाधव यांनी केले आहे. त्यामुळे राज्यामध्ये लवकरच राजकीय समीकरणे बदलताना दिसणार आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मनसे नेते अविनाश जाधव पुढे म्हणाले की, “प्रभागात आणि वार्डात आमची जी काही ताकद आहे ती दिसून आलेली आहे. मनसे आणि भाजप युती झाली तर आम्ही त्याचे स्वागतच करू. आम्ही एकत्र आलो तर त्याचा फायदा भारतीय जनता पक्षालाच होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्रातील मोठे नाव आहे. त्यांना भेटायला अनेक जण जातात. भाजप आणि मनसे एकत्रित आले तर भाजपची ताकद वाढेल. आमची देखील ताकद वाढेल. दरम्यान, मनसेच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत आपण नव्हतो, असे मत मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे हे एकत्रितपणे राजकीय क्षेत्र गाजवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे.
राज्यामध्ये बीडचे मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन राजकारण रंगले आहे. अनेक नेत्यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सात्वंन केले आहे. पीडित देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी राज ठाकरे जाणार असल्याची माहिती अविनाश जाधव यांनी दिली. “संतोष देशमुख कुटुंबाच्या सोबत मनसे आहे. नजीकच्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या कुटुंबाला भेट देतील”, अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली आहे.