‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
आमदार थोरवे यांच्या निवासस्थानी पोहचलेले जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी गणरायाचे मनभावे दर्शन घेतले.त्यावेळी आमदार महेंद्र थोरवे,माजी उप सभापती मनोहर थोरवे, युवासेना जिल्हा प्रमुख प्रसाद थोरवे,लहान बंधू विश्वनाथ थोरवे आणि ॲड संकेत भासे यांचे त्यांचे स्वागत केले. जमलेल्या असंख्य कार्यकर्ते त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना गणरायाची मनोभावे पूजा करणारे थोरवे कुटुंब यांना आणखी बळ देवो आणि त्यांचा मतदारसंघ आणखी सुरक्षित होवो अशी सदिच्छा गणरायाकडे व्यक्त केली.
खासदार सुनील तटकरे यांच्याकडे गणेश दर्शनाला गेल्याने महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे नाराज आहेत. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्यासाठी आले आहेत काय? या प्रश्नाच्या उत्तरात भरत गोगावले यांनी ही दोन्ही आपली माणसे आहेत,त्यांच्या घरासमोरून जात होतो आणि त्यामुळे बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गेलो दुसरे काही नाही असे सांगत गोगावले यांनी या दोघांची दुसरी टर्म आहे,त्यांची हॅट्ट्रिक होणार हे कोणीही रोखु शकत नाही आणि त्यासाठी त्यांनी देव आताच पाण्यात ठेवले तरी हरकत नाही.पण मी कधी चुकीचा सल्ला देत नाही आणि त्यामुळे या दोघांनी माझ्यावर विश्वास ठेवावा आणि सबुरीने घ्यावे त्यांची हॅट्ट्रिक कोणी रोखू शकत नाही.
मला पालकमंत्री पदावर बसवण्यासाठी महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांचे प्रयत्न कोणीही नाकारू शकत नाही. मी तर विसरू शकत नाही,त्यामुळे त्यांनी ज्या ज्यावेळी बोलावल त्या त्या वेळी कर्जत येथे आलो आहे, मागील वर्षी देखील आलेलो आणि यावर्षी देखील आलो आहे.
महायुती मधील नेत्यांची खालापूर मध्ये गुप्त बैठक झाली त्या बैठकीला महेंद्र थोरवे यांना बोलावलं नव्हतं या प्रश्नाच्या उत्तरात गोगावले यांनी हॉटेल मध्ये बैठक झाली तर ती गुप्त असते पण आम्ही जाहीर भेटलो आहोत,मात्र त्यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांना बोलावलं नव्हतं पुढील बैठकीला रायगड चे दोन्ही खासदार आणि माझ्यासह दोन्ही आमदार बैठकीला असतील असे यावेळी बोलताना गोगावले यांनी स्पष्ट केले.






