सचिन अहिरांच्या बिनविरोध निवडीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोठे कौतुक (Photo Credit- X)
१ जुलै रोजी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी निवडणूक पार पडणार होती. महायुतीकडून सचिन अहीर यांनी, तर ठाकरे गटाकडून जगन्नाथ अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे या पदासाठी चुरस निर्माण होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, ऐनवेळी, ठाकरे गटाने ज. मो. अभ्यंकर यांचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. परिणामी, सचिन अहिर यांची या पदावर बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
पाहा व्हिडिओ
Heartiest congratulations to MLC Sachin Ahir on being unanimously elected as the Deputy Chairman of the Legislative Council! विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी एकमताने निवड झाल्याबद्दल आमदार सचिन अहिर यांचे मनःपूर्वक अभिनंदन! (विधानपरिषद, मुंबई | दि. 1 जुलै 2026)@AhirsachinAhir… pic.twitter.com/xKugqqSspU — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 1, 2026
सचिन अहीर यांच्या निवडीनंतर त्यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत त्यांचे कौतुक केले. मुख्यमंत्री म्हणाले, ‘सचिन अहीर हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेले राजकारणी आहेत. त्यामुळे योग्य वेळी थेट ‘गोल’ कसा करायचा आणि योग्य वेळी योग्य निर्णय कसा घ्यायचा, याची अचूक क्षमता त्यांच्यामध्ये आहे.’ पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला, ‘१९९९ मध्ये मी आणि सचिन अहिर पहिल्यांदा एकत्र आमदार म्हणून निवडून आलो होतो. ‘अहिर’ या शब्दाचा मूळ अर्थ गोपालक आणि निर्भीड असा होतो. मला त्यांचा प्रदीर्घ अनुभव असून ते अत्यंत निर्भीडपणे आणि अभ्यासूपणे काम करणारे नेतृत्व आहे.’
सहा खासदारांचे बंड आणि आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्यानंतर, आता पक्षात आणखी एका मोठ्या फुटीबाबतच्या खळबळजनक बातम्या समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन अहिर यांच्या पावलावर पाऊल टाकत विधान परिषद सदस्य सुनील शिंदे यांनीही बंडखोर पवित्रा घेतला आहे. अशी चर्चा आहे की शिंदे हे एकटेच हे पाऊल उचलत नाहीत; त्यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटातील सुमारे ११ आमदार आणि अनेक माजी नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होण्याच्या तयारीत आहेत.
‘सचिन अहिर गेल्याने कसला धक्का?’; ठाकरेंचे नेते सुनील प्रभुंचा सवाल, सुनील शिंदेंचाही घणाघात






