भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रामध्ये मतचोरी झाल्याचे मान्य केल्याचा व्हिडिओ यशोमती ठाकूर यांनी शेअर केला आहे (फोटो - सोशल मीडिया)
Nitin Gadkari on Voter List fraud : नागपूर : महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूका पार पडल्या. यामध्ये महायुती भरघोस यश मिळाले. यंदाची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जात होती. बंडखोरीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे जनमन ओळखण्यासाठी या निवडणूकीकडे देशभराचे लक्ष लागले होते. मात्र या निवडणूकीमध्ये निवडणूक आयोगाकडून घोटाळा झाला असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून सातत्याने केला जात आहे. या संदर्भात आता कॉंग्रेसकडून भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा व्हिडिओ शेअर केला जात आहे. यामध्ये नितीन गडकरी हे मतदारांचे नावं गायब असल्याचे म्हणत आहेत.
कॉंग्रेस नेत्या व माजी खासदार यशोमती ठाकूर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एका वाहिनीला मुलाखत देत आहेत. यामध्ये त्यांची कुटुंबियांसहित त्यांना मत देणारी अनेक माणसांची नावे यादीतून काढून टाकली असल्याचे नितीन गडकरी म्हणत आहेत. नितीन गडकरी म्हणाले की, माझ्यावेळेस साडे तीन लाख मतदार हे यादीतून वगळण्यात आले होते. जे मला मतदान देणारे मतदार आहेत त्यांची नावे कापण्यात आली. मला कोणावर आरोप करायचे नाहीत. पण सत्य हे आहे की मतदारांची नावे वगळण्यात आली होती. यामध्ये माझ्या परिवारमधील देखील लोकं होती, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माजी खासदार यशोमती ठाकूर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, ये अंतर की बात, गडकरीजी सत्य के साथ..काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांना खोटं ठरवू पाहणाऱ्या भाजपच्या अंधभक्तांनी हा व्हिडिओ पहावा. आतातर भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनीच तुम्हाला उघडं पाडतंय. त्यांच्या स्वतःच्या नागपूर मतदारसंघात साडे तीन लाख मतदार मतदार यादीतून वगळले गेल्याचं गडकरीजी सांगतायत. भाजपवालेहो, उघडा डोळे, ऐका नीट, असा टोला कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपला लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले राहुल गांधी?
कॉंग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीन दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी थेट पुरावे सादर करुन महाराष्ट्रामध्ये मतदार यादींमध्ये घोटाळा झाला असल्याचे म्हणत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी म्हणाले की, “महाराष्ट्रात निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यात आल्या महाराष्ट्र निवडणुकीत फसवणूक करून मतदान करण्यात आले. मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर मतदारांची संख्या अचानक वाढली, ही बाब संशयास्पद आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या पाच महिन्यांच्या काळात राज्यातील मतदार यादीत मोठ्या प्रमाणात नावे जोडण्यात आली. महाराष्ट्रातील लोकसंख्येपेक्षा जास्त मतदान करण्यात आले. जवळपास ४० लाख बनावट मते मतदार यादीत जोडण्यात आली, आपल्या लोकशाहीची मुलभूत कल्पना म्हणजे – ‘एक व्यक्ती, एक मत’. मात्र, जर मतदार यादीच चुकीची असेल, बनावट नावे त्यात असतील, तर ही संकल्पनाच धोक्यात येते, असे म्हणत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.