अहमदपूर येथील मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनने महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांना कुराणची मराठी प्रत दिली (फोटो - सोशल मीडिया)
लातूर : भाजप नेते व मत्स व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मुस्लिम समाजाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. नितेश राणे यांच्या अनेक वादग्रस्त विधानांनंतर, मुस्लिम कल्याण संघटनेने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनने महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांना कुराणची मराठी प्रत स्पीड पोस्टद्वारे पाठवली आहे. यामुळे आता नितेश राणे हे आता मराठीमधून कुराण वाचणार का प्रश्न निर्माण झाला आहे.
मुस्लिम कल्याण संघटनेचे मौलाना मुफ्ती फाझिल यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, “आम्ही नितेश राणे यांना कुराणची मराठी प्रत पाठवली आहे जेणेकरून ते ते वाचू शकतील आणि इस्लामचे सत्य आणि त्याची शिकवण समजून घेऊ शकतील. कुराण प्रत्येक मानवाला शांती आणि बंधुत्वाचा संदेश देतो. आम्हाला आशा आहे की हे पवित्र पुस्तक वाचल्यानंतर ते भविष्यात अशी विधाने करण्यापासून परावृत्त होतील.” अशा शब्दांत मौलाना मुफ्ती फाझिल यांनी मंत्री नितेश राणे यांना टोला लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राणेंच्या वादग्रस्त विधानांची मालिका
पुढे मौलाना मुफ्ती फाझिल म्हणाले की, नितेश राणे यांचे मुस्लिम टोपी, दाढी किंवा कुराण यांसारख्या टिप्पण्यांमुळे समाजात चुकीचे संदेश पसरतात. व्यक्तीची ओळख त्याच्या भाषेवरून आणि चारित्र्याने होते आणि सत्य कुराण वाचून उघड होते. राणे यांनी मुस्लिम समुदाय आणि इस्लामविरुद्ध केलेल्या विधानांना उत्तर म्हणून हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे देखील मुस्लीम वेलफेअर असोसिएशनकडून सांगण्यात आले आहे.
द्वेष पसरवण्याची भूमिका नाही
कुराणची ही मराठी भाषेतील प्रत लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथून नितेश राणे यांना स्पीड पोस्ट करण्यात आली. यावेळी, अनेक मौलाना आणि मुफ्ती फाझिल आणि शहरातील इतर लोक उपस्थित होते. संघटनेने म्हटले आहे की त्यांचा उद्देश कोणाविरुद्ध द्वेष पसरवणे नाही तर समाजात जागरूकता आणि एकता वाढवणे आहे. या उपक्रमाद्वारे तो लोकांना इस्लाम योग्य पद्धतीने समजून घ्यायचा आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी (१६ जुलै) माध्यमांशी संवाद साधताना मराठी भाषेवरील वादावर प्रतिक्रिया देताना कुराण आणि अजानचा विषय मध्येच काढला. मंत्री नितेश राणे म्हणाले की, मदरशांमध्ये उर्दूऐवजी मराठी शिकवली पाहिजे आणि अजान मराठीत असावी. मदरशांमध्ये खरे शिक्षण तेव्हाच होईल जेव्हा मराठी भाषेत शिक्षण दिले जाईल, अन्यथा तिथून फक्त बंदुकाच बाहेर पडतील.” असे वादग्रस्त विधान मंत्री नितेश राणे यांनी केली आहे.
नितेश राणे यांच्या या विधानावर समाजवादी पक्षाचे (सपा) ज्येष्ठ नेते अबू आझमी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नितेश राणेंवर कारवाई करावी आणि त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा रस्ता दाखवावा अशी मागणी केली होती.