बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पशू बाजार बंद ठेवण्याबाबत फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री असतील, हे बुधवारी निश्चित झाले. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तबही झाले. त्यानंतर लगेचच भाजपच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी फडणवीस यांची निवड झाली. असे असताना आता आज ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्रिही शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
हेदेखील वाचा : Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रिपदी वर्णी का लागली? ही आहेत ५ प्रमुख कारणं
नव्या सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह एनडीएशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, भाजपच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी फडणवीस यांची निवड झाल्यानंतर बुधवारी महायुतीच्या सर्व पक्षांनी राज्यपाल सी. राधाकृष्णन यांची राजभवनावर भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी, अशी शिफारस करणारे पत्र राज्यपालांना सादर केले.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला 230 हून अधिक जागा जिंकता आल्या आहेत. त्यामुळे त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र, निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतरही मुख्यमंत्रिपदावरून तिढा निर्माण झाला होता. आता अखेर हा तिढा सोडवण्यात यश आले आहे.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री बनण्यास होते इच्छुक
विधानसभेचा निकाल लागून पंधरवडा होत आला तरी राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नव्हते. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री बनण्यास इच्छुक होते. तसेच भाजपमधूनही मुख्यमंत्रिपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू होती. अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
गृहमंत्रिपदावरून महायुतीत तिढा कायम
राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी काही तासांवर आला आहे. असे असताना गृहखात्यावरून तिढा कायम आहे. शिंदे गटाने भाजपकडे गृह आणि अजित पवार गटाने गृहनिर्माण खात्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे स्वीकारणार असतील तर त्यांना गृहमंत्रिपद मिळावे असे शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील म्हणाले तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने गृहनिर्माण खात्याची मागणी केली.
एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ?
एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती दिली जात आहे. गेल्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना गृहखाते हे त्यांच्याकडे होते. तोच तर्क शिवसेना आता देत आहे. मात्र, भाजप गृहखाते सोडण्यास तयार नाही, त्यामुळे गृहखाते आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : संभलमध्ये राजकारण तापले! विरोधी पक्षनेते राहुल गांधी अन् प्रियांका गांधींचा दौरा, मात्र प्रशासनाकडून अडवणूक