शिलेदारांचे कारनाम्यांमुळे एकनाथ शिंदे अडचणीत; अचानक दिल्लीत दौरा, पक्षात अस्वस्थता
Mumbai News: गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील आमदार आणि खासदार त्यांच्या वादग्रस्त कृतींमुळ अडचणीत आले आहेत. दिवसेंदिवस शिंदेसेनेतील नेत्यांची एक-एक प्रकरणे उघडकीस येतआहेत. त्यामुळे दिवसागणिक नव्या पेचप्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. शिंदेसेनेत सुरू असलेल्या या मालिकांमुळे दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंनी अचानक दिल्लीत धाव घेतली.शिंदेसेनेतील काही शिलेदारांची वादग्रस्त प्रकरणे गेल्या काही दिवसांत सार्वजनिक झाल्याने केंद्रीय नेतृत्त्व नाराज असल्याच्याही चर्चा आहेत. त्यात व्हिडिओ व्हायरल होणं, पैशांच्या बॅगांची चर्चा, स्थानिक पातळीवर प्रशासनाशी वाढलेला संघर्ष, तसेच अनेक मंत्र्यांच्या आक्रमक आणि असमंजस विधानांनी पक्षाची प्रतिमा डागाळली आहे.
या सगळ्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राजकीय दबाव वाढत असून, पक्षात अंतर्गत नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते देखील या घडामोडींमुळे संभ्रमावस्थेत आहेत. दिल्ली दौऱ्यात शिंदेंनी पक्षश्रेष्ठी आणि केंद्रीय नेतृत्वाशी भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीत शिंदे गटातील वादग्रस्त वागणुकीवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीही आता संयम गमावण्याचे संकेत दिले आहेत. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पक्षाची प्रतिमा सावरणे, हे मुख्यमंत्री शिंदेंपुढचे मोठे आव्हान ठरू शकते.
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीच्या किंमतीही वधारल्या! जाणून घ्या सविस्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट सध्या त्यांच्या काही मंत्र्यांच्या वादग्रस्त कृतीमुळे अडचणीत आला आहे. गेल्या काही दिवसांत शिंदेसेनेतील प्रमुख नेत्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले असून, त्याचे पडसाद महायुतीतही उमटू लागले आहेत. त्यामुळे महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शिंदेसेनेचे सहा मंत्री आणि आमदार अलीकडच्या काळात वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असून, महायुतीच्या एकसंधतेवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
अर्जुन खोतकर- अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या विश्रामगृहातील खोलीत कोट्यवधी रुपये सापडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी खोतकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदिपान भुमरे- संदिपान भुमरे यांनी भावजयीला दारू परवाना मिळवून दिल्याचा आरोप असून, मंत्रिपदाचा गैरवापर केल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल झाली आहे.
संजय गायकवाड – संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय शिरसाट- संजय शिरसाट यांच्याविरुद्ध व्हिट्स हॉटेल प्रकरणी आयकर विभागाने नोटीस पाठवली असून, त्यांच्या खोलीत पैशांची बॅग असलेला व्हिडिओही व्हायरल झाला आहे. याशिवाय, त्यांनी दिलेलं “इथून पुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत” हे वक्तव्यही वादग्रस्त ठरलं आहे.
शंभूराज देसाईं – शंभूराज देसाईं यांनी सभागृहात अपशब्द वापरत आमदार परबांना धमकी दिल्याचं प्रकरण गाजत आहे.
श्रावण महिन्यात चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, जाणून घ्या यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे
या घडामोडींमुळे गेल्या तीन दिवसांत शिंदेसेनेतील मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळेच महायुतीत अंतर्गत कोंडी निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे ‘महायुतीत धुसफुस सुरू आहे का?’ असा सवालही विरोधी महाविकास आघाडीकडून उपस्थित केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या साऱ्या प्रकरणांची गंभीर दखल घेत, पक्षातील नेत्यांना कडक शब्दांत समज दिल्याचे सांगितले जात आहे. “पक्षाची प्रतिमा मलीन करणारी कोणतीही बेशिस्त वागणूक खपवून घेतली जाणार नाही.” अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी इशारा दिला आहे.
इतकेच नव्हे तर, प्रतिक्रिया देताना जबाबदारीने वागा. चुकीची आणि पक्षाला अडचणीत आणणारी भूमिका टाळा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना, शिंदेसेनेतील बेशिस्त वागणूक पक्षासाठी आणि महायुतीसाठी डोकेदुखी ठरू नये, यासाठीच मुख्यमंत्री पावले उचलत असल्याचं दिसत आहे.