भारताने व्हावे सावध? निवडकीपूर्वी बांगलादेशात पाकिस्तानी फौज दाखल; युनूस सरकारने अंथरल्या पायघड्या (फोटो सौजन्य: एक्स/@PakinBangladesh)
भारताविरोधात शेजारील देशांचा शिजतोय कट; पाकिस्तान आणि बांगलादेशला पडला 1971 चा विसर
पाकिस्तानने ३० पत्रकारांची आणि १० नागरी समाज कार्यकर्त्यांची टीम बांगलादेशला पाठवली आहे. त्यांचे बांगलादेश सरकार आणि निवडणूक आयोगाने भव्य स्वागत केले आहे. पत्रकारांच्या व्हिसा आणि निवासस्थानाचीही सर्व व्यवस्था, पत्रकारांच्या स्वागतासाठी खास डिनरनेचे आयोजनही करण्यात आले आहे. यामुळे पाकिस्तानसाठी ही भेट राजकीय दृष्टीकोनातून महत्वाचा ठरत आहे. शिवाय पाकिस्तानी पत्रकारांना बांगलादेश निवडणुकांबाबत, पाकिस्तान-बांगलादेश संबंधावर सकारात्मक आणि संतुलित वृत्तांकन करण्यास सांगण्यात आले आहे. याचा हेतू पाकिस्तान-बांगलादेश राजकीय संबंध मजबूत करण्याचा आणि जागतिक पातळीवर प्रतिमा वाढविण्याचा आहे.
सध्या पाकिस्तानच्या या हालचालीने भारताची चिंता वाढली आहे. बांगलादेशात पाकिस्तान (Pakistan) नेमका कोणता नरेटिव्ह गेम खेळत आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाकिस्तानला गेल्या अनेक दशकांपासून कथा मांडण्याचे ढोंग करत आला आहे. पाकिस्तानला हा नरेटिव्ह खेळ उत्तम प्रकारे समजलाही आहे. परंतु भारताने या पैलूकडे पुरुसे लक्ष दिलेले नाही. यामुळे ही बाब भारतासाठी चिंतेची असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
A group of 40 Pakistani journalists representing the country’s print, broadcast and digital media is visiting Bangladesh to cover the 13th Parliamentary Elections/Referendum scheduled for 12 February 2026. @ForeignOfficePk pic.twitter.com/MAap3RPpkF— Pakistan High Commission Bangladesh (@PakinBangladesh) February 10, 2026
‘भारताविरुद्ध बांगलादेश युनूस सरकार षड्यंत्र रचत असल्याचा पाकिस्तान तज्ञांचा दावा म्हणाले…






