AUS vs IRE, T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज १४ व्या सामन्यात आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने उभे ठाकले आहेत. या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना मार्कस स्टोइनिसच्या खेळीच्या जोरावर ६ गडी गमावून १८१ धावा केल्या आणि आयर्लंडसमऑर १८२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा नोइरणी घेतला. परंतु, हा निर्णय सुरवातीला ऑस्ट्रेलियाला चांगलाच अडचणीचा ठरल्याचे दिसले. कर्णधार ट्रॅव्हिस हेड आणि जोश इंगलिस यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. परंतु संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाच्या ७ धावांवर कर्णधार ट्रेव्हीस हेड ६ धावा काढून बाद झाला. त्यानंतर इंग्लिस आणि कॅमेरून ग्रीन यांनी डाव सावरला.
इंग्लिस आणि कॅमेरून ग्रीन यांनी ४९ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर कॅमेरून ग्रीन २१ धावा करून बाद झाला. त्यानंतर मैदानावर आलेला ग्लेन मॅक्सवेल देखील आपली कमाल दाखवू शकला नाही. तो ९ धावा करून माघारी गेला. तसेच इंग्लिस देखील बाद झाला. त्याने १७ चेंडूत ३७ धावा केल्या. इंग्लिस बाद झाल्यावर संघाचा डाव संकटात सापडला, त्यानंतर मैदानावर मॅट रेनशॉने शानदार खेळ केला, तो ३७ दहाव करून माघारी गेला. त्यानंतर संघ चांगलाच अडचणीत आला.
आशावेळी मार्कस स्टोइनिस (आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६) धावून आला आणि त्याने तळाच्या फलंदाजांना सोबत घेऊन संघाची धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्याने २९ चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४५ धावा केल्या. त्यानंतर तो माघारी गेला. कूपर कॉनोली आणि झेवियर बार्टलेट हे प्रत्येकी ११ धावांवर नाबाद राहिले आणि संघाची धावसंख्या १८१ पर्यंत पोहचवला. आयर्लंडकडून मार्क अडायरने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
आयर्लंड प्लेइंग इलेव्हन: पॉल स्टर्लिंग (कर्णधार), रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लोर्कन टकर (क्विट), कर्टिस कॅम्फर, बेंजामिन कॅलिट्झ, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलानी, मार्क अडायर, बॅरी मॅकार्थी, मॅथ्यू हम्फ्रीज
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन: ट्रॅव्हिस हेड (कर्णधार), जोश इंगलिस, कॅमेरॉन ग्रीन, मॅट रेनशॉ, कूपर कॉनोली, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, नॅथन एलिस, झेवियर बार्टलेट, मॅथ्यू कुहनेमन, अॅडम झांपा






