निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट (फोटो - सोशल मीडिया)
कराड : राज्यामध्ये विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे जोरदार चर्चांना उधाण आले आहे. निवडणूका जाहीर झाल्यामुळे राजकारण देखील रंगले आहे. नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या असून बैठकांचे सत्र वाढले आहेत. यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला निलेश राणे गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
यंदा महायुती म्हणून पहिल्यांदाच शिंदे गट, अजित पवार व भाजप एकत्रितपणे लढत आहेत. त्यामुळे जागावाटप आणि फॉंर्म्युला यासाठी मोठी चर्चा झाली. त्यामध्ये कराड ही जागा शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे. आता माजी खासदार असलेल्या निलेश राणे यांना विधानसभा निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी ते कराडमधून आग्रही आहेत. मात्र ही जागा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे असल्यामुळे नेत्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.
हे देखील वाचा : मोठी बातमी ! मनोज जरांगेंचं अखेर ठरलं! विधानसभा निवडणूक लढणार
जागावाटप हे अंतिम टप्प्यामध्ये आले असून येत्या दोन दिवसांमध्ये महायुतीची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कराडच्या जागेसाठी आता निलेश राणे हे काय राजकारण करणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. भाजपचे निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-मालवण मतदारसंघात ठाकरे गटातील वैभव नाईक हे सध्या विद्यमान आमदार आहेत. वैभव नाईक यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडे प्रभावी उमेदवार नसल्याचे चित्र असताना वैभव नाईक यांच्या विरोधात निलेश राणे यांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याच्या हालाचाली सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.