Madhav Bhandari Muhammad Ali Jinnah:'जिन्ना शेवटच्या काळात ३-४ तास ॲम्ब्युलन्समध्ये तडफडत होते'; माधव भंडारींचा खळबळजनक दावा
मोहम्मद अली जिन्ना तीन-चार तास अॅम्युलन्समध्ये तडफडत होते
लियाकत अली बदलला आणि मग त्याला जिन्नांची अडचण व्हायला लागली
जिनानंतर अखिल भारतीय मुस्लिम लीगचे सर्वात प्रमुख नेते होते
Madhav Bhandari on Muhammad Ali Jinnah News: पाकिस्तानचे निर्माते शेवटच्या काही तासांत मोहम्मद अली जिन्ना तीन-चार तास अॅम्युलन्समध्ये तडफडत होते, पण त्यांना शेवटच्या काही तासांत वैद्यकीय मदत मिळाली नाही, पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान यांनी शेवटच्या दिवसांत मोहम्मद अली जिन्ना यांचे खूप हाल केले, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांनी केला आहे. नवराष्ट्र’ला दिलेल्या विषेश मुलाखतीत ते बोलत होते.
माधव भंडारी म्हणाले की, पंतप्रधान झाल्यावर लियाकत अली बदलला आणि मग त्याला जिन्नांची अडचण व्हायला लागली. त्याचवेळी त्याला जिन्नांच्या आजारपणाबाबत कळलं. जिन्नांचं आयुष्य फार दिवस नाही, हे त्याच्या लक्षाल आलं आणि त्यानंतर त्याने त्याच्यावरचं जिन्नांचं जे छत्र होतं ते झुगारून दिलं. हे नैसर्गिक आहे. पण त्यानंतर त्याने जिन्नांचा जो छळ केला. हे पाकिस्तानमधल्याचा काही पत्रकारांनी लिहून ठेवलं आहे.
माधव भंडारी म्हणाले की, ” जर जिन्ना आजारी नसते तर त्यांचा खून झाला असता, जिन्नांचा नैसर्गिक मृत्यू झाला त्यामुळे लियाकत अलीला त्यांचा खून करण्याची संधी मिळाली नाही . पण जिन्ना आजारी नसते, त्यांना नैसर्गिक मरण आले नसते तर त्यांचा खून नक्की झाला असता, अशी परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती. लियाकल अली ने जिन्नांच्या शेवटच्या महिन्यात दिवसांत दाखवून दिले. जिन्नांना मिळणारे औषधोपचारामध्ये हेळसांड केली, त्यांचे खूप हाल केले. त्यांना औषधोपचार मिळू दिले नाहीत. त्यांना वैद्यकीत मदत मिळू दिली नाही.
एवढेच नाही, जिन्ना शेवटच्या दिवशी जिन्ना क्वेटा मध्ये होते. तिथून त्यांना कराचीला आणले गेले. तर कराची विमानतळावर त्यांना घ्यायला जी ॲल्युलन्समध्ये ॲब्युलन्स पाठवली होती त्या पेट्रोलच नव्हते. ती दोन-अडीच किलोमीटर पुढे गेल्यावर ती मध्येच बंद पडली पुढचे जवळपास तीन साडेतीन तास दुसरी पर्यायी अॅम्युलन्स तिथे पोहचलीच नाही. दुसरे वाहन आले नाही. एवढच नव्हे तर या काळात जिन्नासोबत त्यावेळी कुणीही नव्हते त्यांची बहीण, त्यांचा डॉक्टर आणि अंगरक्षक इतकेच होते. हा सर्व प्रकार लियाकत अलीने केली केला तो अत्यंत क्रूरपणाचा होता. असंही भंडारी यांनी सांगितलं.
लियाकत अली यांनी भारताचा अर्थसंकल्प सादर केला होता. ते आझाद राजवटीचे पहिले पंतप्रधान आणि जिनानंतर अखिल भारतीय मुस्लिम लीगचे सर्वात प्रमुख नेते होते. जेव्हा अंतरिम सरकार स्थापन झाले, तेव्हा मुस्लिम लीगने त्यांना आपले प्रतिनिधी म्हणून पाठवले होते. पंडित नेहरूंनी त्यांच्यावर अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवली होती.
पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान, लियाकत अली खान यांनी २ फेब्रुवारी १९४६ रोजी भारताचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर त्यांनी १४ ऑगस्ट १९४७ ते १६ ऑक्टोबर १९५१ पर्यंत पंतप्रधान म्हणून काम पाहिले. १६ ऑक्टोबर रोजी त्यांची हत्या करण्यात आली. १९५० मध्ये, त्यांनी ८ एप्रिल १९५० रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एका करारावर स्वाक्षरी केली, ज्याचा उद्देश दोन्ही देशांतील अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि भविष्यातील युद्धाची शक्यता दूर करणे हा होता.
पण लियाकत अली यांच्या या निर्णयामुळे अनेक नेते संतप्त झाले होते. तत्कालीन सरकारमधील मंत्री, श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी नेहरू आणि लियाकत अली यांच्यातील करारामुळे ६ एप्रिल १९५० रोजी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आणि जनसंघाची स्थापना केली. लक्षणीय बाब म्हणजेच जनसंघाचेच पुढे भाजपमध्ये रूपांतर झाले. पाकिस्तानची राजधानी रावळपिंडी येथील कंपनी बागमध्ये त्यांची हत्या करण्यात आली, त्याच ठिकाणी जिथे २००७ मध्ये बेनझीर भुट्टो यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
पाहा व्हिडीओ-






