Ratnagiri News: चिपळूणबाबत आमदार शेखर निकम यांच्यासोबत लवकरच चर्चा करणार: उदय सामंतस यांचे वक्तव्य
कोल्हापुरातील रस्त्याचा विषय थेट उच्च न्यायालयात; कोर्टाने नोटीसच केली जारी
मंत्री सामंत म्हणाले की, चिपळूणबाबत आपली तेथील आमदार शेखर निकम यांच्याशी चर्चा होईल. महायुतीबाबत ते सकारात्मक आहेत आणि यातून चर्चा पुढे जाऊ शकेल आणि त्यातून चांगले आउटपुट निघेल असा मला विश्वास आहे. राजेश सावंत यांच्या पत्रकार परिषदेवर मी कशाला बोलू? मला त्यांच्यावर काहीही बोलायचे नाही, असे म्हणत, त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. (फोटो सौजन्य – Pinterest)
कणकवलीच्या निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले, कणकवलीत फक्त शहर विकास आघाडी आहे आणि कालची सभा बघितल्यानंतर संदेश पारकर नक्की आघाडीवर आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध विषयांवर स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी रांजणगाव एमआयडीसीमधील प्रदूषण, आगामी निवडणुकांमधील युतीचे चित्र आणि विरोधकांवर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
पालकमंत्री सामंत यांनी राजणगाव एमआयडीसीतील प्रदूषणाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार तातडीने बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले. येत्या १५ दिवसांत रांजणगावच्या प्रदूषणाच्या बाबतीत बैठकीचे आयोजन केले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. या बैठकीला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे. मी स्वतः ग्रामस्थांसोबत त्या ठिकाणी फिरलो आहे, त्यांना त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, असे आश्वासन सामंत यांनी दिले.
एकनाथ शिंदे दिल्लीला जातात, तेव्हा नरेंद्र मोदी याच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात आणि (विरोधी) त्यांचे नेते दिल्लीत गेले तर कुठे बसतात, हे सर्वांना चांगलेच माहिती आहे. तसेच राहुल गांधीच्या नादाला लागले तर काय होते, हे विधानसभेत आणि परवाच्या लागलेल्या निकालावरून स्पष्ट झाले आहे, असे म्हणत त्यांनी विरोधी पक्षाच्या अपयशावर निशाणा साधला.






