Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘वहिंनींचे सगळे हट्ट पुरवता, मग तुम्हाला लाडक्या बहिणीच नको झाल्यात का ?’ रोहिणी खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी आणि पडताळणी प्रक्रियेनंतर 92 लाखांहून अधिक महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळल्याचा दावा समोर आला आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या रोहिणी खडसे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला असून, 'कॅग'च्या अहवालामुळेही योजना पुन्हा चर्चेत आली आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 13, 2026 | 02:27 PM
'वहिंनींचे सगळे हट्ट पुरवता, मग तुम्हाला लाडक्या बहिणीच नको झाल्यात का ?' रोहिणी खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

'वहिंनींचे सगळे हट्ट पुरवता, मग तुम्हाला लाडक्या बहिणीच नको झाल्यात का ?' रोहिणी खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

Follow Us
Follow Us:
  • 92 लाख महिलांची नावे वगळल्याचा रोहिणी खडसेंचा दावा
  • ई-केवायसी आणि पडताळणीनंतर लाभार्थी यादीत बदल
  • ‘कॅग’च्या अहवालात योजनेच्या आर्थिक भारावर निरीक्षण
 

महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ई-केवायसी (e-KYC) आणि लाभार्थी पडताळणी प्रक्रियेनंतर 92 लाखांहून अधिक महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळल्याचा दावा समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या रोहिणी खडसे यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.

रोहिणी खडसे यांचा सरकारवर निशाणा

रोहिणी खडसे यांनी त्यांच्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत सरकारवर टीका केली. त्यांनी दावा केला की, काही महिन्यांपूर्वी 80 लाखांहून अधिक महिलांना योजनेतून वगळण्यात आले होते, तर आता आणखी 12 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे एकूण 92 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले, असा त्यांचा आरोप आहे.

तसेच त्यांनी सरकारकडून योजनेवरील खर्च 26,197.78 कोटी रुपयांवरून 33,697 कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली.

Maharashtra Politics: मुख्यमंत्रीपद अन् अमित शाहांकडूनच भाजपची ऑफर; बड्या नेत्याचा खळबळजनक खुलासा

नेमकं काय म्हणाल्या रोहिणी खडसे ?

रोहिणी खडसे आपल्या ‘X ‘ अकाऊंटवरून पोस्ट करत म्हणाल्या, “काही महिन्यांपूर्वी ८० लाख पेक्षा अधिक महिला लाडकी बहिण योजनेतून बाद करण्यात आल्या होत्या. आता महिन्याभराने आणखी १२ लाख लाडक्या बहिणींना बाद करण्यात आले आहे. असं करून सरकारने तब्बल ९२ लाख महिलांना अपात्र केलं आहे.”

“सरकारमधील लोक सांगतात की लाडक्या बहिणींचा खर्च २६ हजार १९७.७८ कोटींवरून ३३ हजार ६९७ कोटींवर गेला आहे. लाडक्या बहिणींवर ७५०० कोटींचा खर्च वाढला आहे.”

काही महिन्यांपूर्वी ८० लाख पेक्षा अधिक महिला लाडकी बहिण योजनेतून बाद करण्यात आल्या होत्या. आता महिन्याभराने आणखी १२ लाख लाडक्या बहिणींना बाद करण्यात आले आहे. असं करून सरकारने तब्बल ९२ लाख महिलांना अपात्र केलं आहे. सरकारमधील लोक सांगतात की लाडक्या बहिणींचा खर्च २६ हजार १९७.७८… pic.twitter.com/FdJ2vmR2sa — Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) July 13, 2026


“काय ओ भाऊ राया, @CMOMaharashtra @mieknathshindeआता तुम्हाला लाडक्या बहिणींचा खर्च दिसतोय ? आता तुम्हाला लाडक्या बहिणी ‘जड’ झाल्यात का ? वहिंनींचे सगळे हट्ट, सगळे लाड पुरवता, मग तुम्हाला लाडक्या बहिणीच नको झाल्यात का ?”

“लाडक्या बहिणींचा खंबीर ‘दादा’ आता नाही पण किमान सुनेत्रा वहिनी तुम्ही तरी लाडक्या बहिणींवर होणारा अन्याय मांडा !” असे त्या म्हणाल्या.

‘संविधान संपवून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न, भाजपला वन नेशन, वन पॉलिटिकल पार्टी हवी’; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

‘कॅग’च्या अहवालामुळे योजना पुन्हा चर्चेत

भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांच्या अहवालातही लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक परिणामांबाबत निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. अहवालानुसार, या योजनेवरील मोठ्या खर्चामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर ताण येऊ शकतो. तसेच 3,542 कोटी रुपयांच्या खर्चाबाबत पुरेशा समर्थनाचा अभाव असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

अहवालानुसार, 2023-24 मध्ये महिला कल्याणासाठीचा खर्च 261.78 कोटी रुपये होता. मात्र, 28 जून 2024 रोजी लाडकी बहीण योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर 2024-25 मध्ये हा खर्च 33,514.36 कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे लाभार्थी पडताळणी, योजनेवरील आर्थिक भार आणि अपात्र लाभार्थ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

Web Title: Ladki bahin yojana 92 lakh beneficiaries removed rohini khadse reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Eknath Shinde
  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Government
  • Rohini Khadse
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

अजितदादांच्या ‘ग्राउंडवर्क’चा राष्ट्रवादीला मोठा फायदा! सोमेश्वरच्या निवडणुकीत विरोधकांना रोखण्यात सुनेत्रा पवारांना यश
1

अजितदादांच्या ‘ग्राउंडवर्क’चा राष्ट्रवादीला मोठा फायदा! सोमेश्वरच्या निवडणुकीत विरोधकांना रोखण्यात सुनेत्रा पवारांना यश

Eknath Shinde Press Conference: ‘कालचा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस’; एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका
2

Eknath Shinde Press Conference: ‘कालचा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस’; एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका

Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!
3

Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!

CM Devendra Fadnavis : सिंहस्थ कुंभमेळ्याआधी नाशिकमध्ये मोठी तयारी! फडणवीसांनी घेतला विकासकामांचा आढावा
4

CM Devendra Fadnavis : सिंहस्थ कुंभमेळ्याआधी नाशिकमध्ये मोठी तयारी! फडणवीसांनी घेतला विकासकामांचा आढावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.