'या' लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार नाही...; राज्य सरकारचा मोठा निर्णय
ज्या लाभार्थी महिलांचा विवाह झाल्यानंतर त्यांचे रेशनकार्डवरील नाव बदलले असले तरी त्यांचा लभा बंद होणार नसल्याचे राज्य सरकराने काही लाभार्थी महिलांचा विवाह झाल्यानंतर रेशनकार्डवरील त्यांचे नाव बदलले असले तरी त्यांचा लाभ बंद होणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या योजनेसाठी पात्रतेचे स्पष्ट नियम निश्चित करण्यात आले होते – २१ ते ६५ वयोगटातील महिला अर्ज करू शकतात आणि एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोनच महिलांनाच योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र, प्रत्यक्षात लाखो महिलांनी हे निकष डावलून अर्ज सादर केले. अनेक कुटुंबांत तीन ते चार महिलांनी अर्ज भरल्याचेही आढळले. पण माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या पडताळणीदरम्यान अशा लाभार्थ्यांना प्रक्रियेतून वगळण्यात आले.
India vs Pakistan : भारत पाकिस्तान सामना पावसामुळे खराब होणार? जाणून घ्या हवामानाचा अहवाल
योजनेच्या निकषानुसार विवाहित आणि अविवाहित अशा दोनच महिलांना लाभ मिळणे अपेक्षित होते. मात्र, अनेक महिलांचा विवाह झाल्यानंतर त्यांचे रेशनकार्ड वेगळे झाल्याने त्या स्वतंत्र कुटुंबातील सदस्य म्हणून गणल्या गेल्या. त्यामुळे त्यांचा लाभ बंद होणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. म्हणजेच, विभक्त रेशनकार्ड असलेल्या सुना किंवा मुलींनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पडताळणी अहवालानुसार ८३,७२२ महिला योजनेच्या निकषात पात्र ठरल्या, तर १४,००० महिलांना विविध कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आले. मात्र सर्वात गंभीर बाब म्हणजे तब्बल दहा हजार महिलांचा दिलेल्या पत्त्यावर ठावठिकाणा मिळाला नाही. अर्ज करताना त्यांनी चुकीचे पत्ते नमूद केले होते किंवा त्या प्रत्यक्षात तेथे राहत नसल्याचे आढळून आले. राज्यभरातील आकडेवारीनुसार अशा महिलांची संख्या चार लाखांहून अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मधुमेह राहील कायमच नियंत्रणात! नियमित फॉलो करा १०-१०-१० चा नियम, शरीरात दिसून येईल सकारात्मक बदल
दरम्यान, योजनेअंतर्गत आधारकार्ड क्रमांक चुकीचा नोंदवल्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अनेक महिलांनी अर्ज करताना चुकीचा आधार क्रमांक नमूद केला. परिणामी, शासनाकडून थेट बँक खात्यात जमा व्हायला हवा असलेला लाभ इतर व्यक्तींच्या खात्यात वर्ग झाला असल्याचे आढळले. त्यामुळे प्रत्यक्ष लाभार्थी महिलांना अद्याप एक रुपयाही मिळालेला नाही. आता चुकीच्या खात्यात जमा झालेली रक्कम वसूल करून मूळ पात्र महिलांच्या खात्यात कशी जमा करायची, हा प्रश्न प्रशासनापुढे उभा राहिला आहे.
लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू होताच महिलांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मोठ्या प्रमाणावर चुकीचे अर्ज, चुकीचे आधार क्रमांक, खोटे पत्ते तसेच एकाच कुटुंबातील अनेक महिलांकडून अर्ज दाखल केल्यामुळे प्रशासनावर मोठा ताण आला आहे. तरीदेखील शासनाने स्पष्ट केले आहे की पात्र महिलांचा लाभ कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. त्यामुळे राज्यातील लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला आहे.






