भाजपचे 'मिशन २०२७' सुरू! नितीन नवीन यांची लखनौमध्ये माजी प्रदेशाध्यक्षांसोबत 'चाय पे चर्चा'
अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली संघटना नव्या उर्जेने आणि नव्या निर्धाराने सातत्याने पुढे जात आहे. मला खात्री आहे की त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप उत्तर प्रदेशात सलग तिसऱ्यांदा नक्कीच जिंकेल असा विश्वास पंकज चौधरी यांनी व्यक्त केला. भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, माजी प्रदेशाध्यक्षांसोचतच्या बैठकीत त्यांच्या संघटनात्मक अनुभवांची देवाणघेवाण झाली आणि २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली.
सूत्रांनुसार, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष विनय कटियार पक्षाच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या या बैठकीला उपस्थित नव्हते. पंकज चौधरी म्हणाले, मी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासोक्त भाजपच्या उत्तर प्रदेश युनिटच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत सहभागी झालो. त्यांच्या अनेक वर्षांच्या संघटनात्मक अनुभवातून आणि कार्यशैलीतून मिळालेले धडे संघटना अधिक मजबूत आणि प्रभावी बनवण्याच्या प्रयत्नांमध्ये निश्चितच उपयुक्त ठरतील.
या बैठकीत भविष्यातील कृती योजना आणि निवडणूक रणनीतीवर चर्चा झाली. मित्रपक्षांच्या नेत्यांनी सांगितले की, आधाडी आणखी मजबूत करणे, तिचा संघटनक्रमक पाया विस्तारणे आणि राज्यात एनडीएला चुना सतेत आणणे या रणनीतीवर बैठकीत झाली. राष्ट्रीय लोक दल (आरएलडी) वे राष्ट्रीय सरचिटणीस त्रिलोक त्यागी यांनी सांगितले की, सर्व मित्रपक्ष पुढील विधानसभा निवडणुका एकत्र लढतील.
आपल्याला निवडणुका एकत्र लढायच्या आहेत आणि २०२० मध्ये उत्तर प्रदेशात रालोआचा विजय निश्चित करायचा आहे, आम्ही त्यासाठी तयारी करत आहोत आणि आजवी बैठक याब उद्देशाने आयोजित करण्यात आली आहे. जागावाटपाबाबत ते म्हणाले की, या विषयावर योग्य केळी चर्चा केली जाईल. आम्ही या विषयावर बैठकीत चर्चा करू, आरएलडीसोबत मिळून आम्ही पुन्हा पनद्वीप सरकार स्थापन करू.
निशाद पार्टीचे अध्यक्ष आणि मत्स्यव्यवसाय मंत्री संजय निशाद म्हणाले की, सर्व जागांवर यश मिळवून ऐतिहासिक विजय साधणे, संघटना मजबूत करणे आणि आघाडीची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवणे यावर चर्चेचा भर असेल. सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष आणि पंचायती राज मंत्री ओम प्रकाश राजभर म्हणाले की, या बैठकीतून २०१७ च्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरीपेक्षा वागले परिणाम दिसून येतील.
उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप २०२७ मध्ये उत्तर प्रदेशात सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल. राज्यातील जनतेला गुंडगिरी, माफिया राजवट, घराणेशाहीचे राजकारण किंवा दंगे नको आहेत. त्यांना विकास, सुशासन आणि सुरक्षा हवी आहे. जनतेने ठरवले आहे की, जर उत्तर प्रदेशात ‘कमळ’ फुलले, तर राज्य आणि तेथील जनता समृद्ध होईल.
मौर्य म्हणाले, जर समाजवादी पक्षाचे ‘सायकल’ पुन्हा सत्तेवर आले, तर ते जनतेवर अत्याचार करतील, त्यांना घाबरवतील आणि जमिनी बळकावण्यास प्रोत्साहन देतील. त्यामुळे, अखिलेश यादव यांनी पोकळ कल्पनाविश्वात रमू नये. २०४७ पर्यंत एक विकसित भारत आणि एक विकसित उत्तर प्रदेश हे आमचे ध्येय आहे, आणि समाजवादी पक्ष पुढील २१ वर्षे सत्तेच्या जवळपासही असणार नाही. २०१७ च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी आणि २०२७ मध्ये त्याहून मोठा विजय मिळवण्यासाठी सरकार आणि संघटना एकत्र कसे काम करतील, यावर चर्चेत लक्ष केंद्रित करण्यात आले. आमचे सर्व रालोआचे मित्रपक्ष एकजूट राहतील.






