सहकार मोडीत काढण्याचा उपमुख्यमंत्र्यांचा डाव; चंद्रराव तावरेंची अजित पवारांवर टीका
Malegaon Sugar Factory Politics: माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगवी (ता. बारामती) येथे सोमवारी (२ जून) आयोजित करण्यात आलेल्या सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक चंद्रराव तावरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. या मेळाव्यास सभासदांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या वेळी बोलताना तावरे म्हणाले, “महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात माळेगाव साखर कारखाना हा एक नावलौकिक असलेला कारखाना आहे. राज्यात उच्चांकी दर देणारा कारखाना म्हणून त्याची ओळख आहे. परंतु बारामती तालुक्याच्या आजूबाजूला पवार घराण्याचे खासगी साखर कारखाने आहेत आणि त्यांची गाळप क्षमता सहकारी कारखान्यांपेक्षा अनेक पटींनी अधिक आहे. पण स्वतःचे खासगी कारखाने चालवण्यासाठी माळेगाव सहकारी कारखाना कर्जबाजारी करून सहकार मोडीत काढण्याचा डाव टाकला जात आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्यात कोटींचे कर्ज घेऊन त्याला आर्थिक डबघाईस आणले गेले.” असा आरोपही त्यांनी यावेळी केला. या आरोपांमुळे माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आगामी काळात अजून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Breaking News: आता मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असताना माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक चंद्रराव तावरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. सांगवी (ता. बारामती) येथे सोमवारी आयोजित सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या कार्यकर्ता मेळाव्यात तावरे म्हणाले, “निरा नदीच्या प्रदूषित पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत मतं मागायला येणार नाही, असं अजित पवार यांनी स्वतःच जाहीरपणे सांगितलं होतं. मात्र आज हा प्रश्न न मिटता ते स्वतः संचालक मंडळात येण्याचा निर्णय घेत आहेत, हे कितपत योग्य आहे?”
वैयक्तिक टीकेलाही उत्तर देताना, तावरे म्हणाले, “माझ्या वयावर ते बोलतात. पण वय झालं म्हणजे खायला लागत नाही का? त्यांच्या तडफडीचं कारण फक्त माळेगावच्या सत्तेची हाव आहे. सभासदांच्या प्रपंचाशी त्यांना काहीही देणंघेणं नाही.”माळेगाव कारखान्याचे सभासद जागृत आहेत. ते चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता देणार नाहीत, याबाबत मला पूर्ण विश्वास आहे.मागील निवडणुकीतील घडामोडींवरही प्रकाश टाकताना, ते म्हणाले, “तेव्हा सत्तेचा वापर करून ४,६०० मतपत्रिका मतमोजणीवेळी बाद करण्यात आल्या आणि सत्ता बळकावण्यात आली. सध्याच्या संचालक मंडळाने चुकीचा कारभार करून कारखाना कर्जबाजारी स्थितीत पोहोचवला आहे.”
रंजनकुमार तावरे म्हणाले, मागच्या निवडणुकीत खा. शरद पवार यांना सन्मानाने माळेगाव कारखान्यावर आणण्यासाठी सत्ता द्या. मात्र सत्ता येऊन पाच वर्षे संपली तरी किती वेळा शरद पवारांना कारखान्यावर आणले, हे जागृत सभासदांना चांगले माहीत आहे. त्यांच्या संचालक मंडळाने चुकीचा कारभार केला म्हणून स्वतःला संचालक मंडळात यावं लागतंय ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल तावरे यांनी स्पष्ट केले.यावेळी ॲड. जी. बी. गावडे, युवराज तावरे, राजेश देवकाते, ॲड. शामराव कोकरे यांनी आपली मनोगत व्यक्त केले.
रंजनकुमार तावरे म्हणाले, मागच्या निवडणुकीत खा. शरद पवार यांना सन्मानाने माळेगाव कारखान्यावर आणण्यासाठी सत्ता द्या. मात्र सत्ता येऊन पाच वर्षे संपली तरी किती वेळा शरद पवारांना कारखान्यावर आणले, हे जागृत सभासदांना चांगले माहीत आहे. त्यांच्या संचालक मंडळाने चुकीचा कारभार केला म्हणून स्वतःला संचालक मंडळात यावं लागतंय ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल तावरे यांनी स्पष्ट केले.यावेळी ॲड. जी. बी. गावडे, युवराज तावरे, राजेश देवकाते, ॲड. शामराव कोकरे यांनी आपली मनोगत व्यक्त केले.