संजय शिरसाट यांनी मनोज जरांगे पाटील यांची संभाजीनगर येथे भेट घेतली (फोटो - सोशल मीडिया)
छत्रपती संभाजीनगर : राज्यामध्ये अनेक मुद्द्यांवरुन राजकारण रंगले आहे. राजकीय नेत्यांच्या वाढत्या वादग्रस्त विधानांवरुन अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजत आहे. आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आणला आहे. अधिवेशनानंतर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. तसेच सत्ताधारी शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून भेटीचे प्रयोजन सांगितले आहे.
संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधून अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, मी मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलो होतो. यावेळी त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चा झाली. विद्यार्थ्यांसंदर्भात काही प्रश्न असून, त्यावर चर्चा झाली. मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीचे काम सुरू नसल्याचे जरांगे यांनी लक्षात आणून दिले आहे. तसेच तीन गॅझेट बाबत नोटिफिकेशन काढले नाही असे त्यांचे म्हणणे आहे. हे सर्व मुद्दे त्यांनी चर्चेमध्ये मांडले आहे. याबाबत सोमवारी मुंबईत गेल्यावर यावर आणखी एक बैठक बोलावता येणार का याबाबत पाहतो. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः यात लक्ष घालत आहे, असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे संजय शिरसाट यांनी राज्यामध्ये सुरु असलेल्या गंभीर घटनांवर प्रतिक्रिया दिली. जालनामध्ये तरुणावर झालेल्या अत्याचाराबाबत संजय शिरसाट म्हणाले की, “पीडित तरुण हा दारू पिल्याचे व्हिडीओ आले आहे. हा भाग असला तरीही चटके देण्याचे भाग निंदनीय आहे, असे चटके देणे योग्य नाही. हा भयानक व्हिडीओ आहे,” असे मत त्यांनी मांडले. तसेच पुण्यामध्ये गौरव अहुजा याने भररस्त्यात केलेल्या अश्लील कृत्यावर देखील संजय शिरसाट म्हणाले की, “असे विकृत लोक समाजात असतात, जे काही सीसीटीव्ही आहे त्यावरून आरोपी पकडले जात आहेत. सरकार गंभीर आहे आणि आरोपी जेलमध्ये कसा सडेल यासाठी प्रयत्न केले जाईल. पुण्यात असे घडू नयेत दुर्देव आहे. उचभ्रू असो की कुणी असो,” असे मत शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना महायुतीमध्ये स्थान नसल्याची टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट यांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “या मूर्ख लोकांना सांगतो कोण, तुमचं कोणी ऐकत नाही, शरद पवार यांचा आता फोनही येत नाही, काँग्रेस विचारत नाही, भास्कर जाधव विरोधीपक्ष नेते होणार नाही माहीत असून त्यांना उचकवण्याचा प्रयत्न केले जात आहे,” असे स्पष्ट मत शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.