विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची पहिली यादी जाहीर, राज ठाकरेंकडून 'या' दोन शिलेदारांच्या नावाची घोषणा (फोटो सौजन्य-X)
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली जात असून, भाजपने काल (20 ऑक्टोबर) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर एकापाठोपाठ एक अनेक संभाव्य याद्या समोर येऊ लागल्या. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कडवी लढत झाली तेव्हा राज ठाकरेंनीही मैदानात उडी घेतली त्यांनीच आज दोन्ही उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.
“उमेदवारांच्या यादीवर शेवटचा हात फिरवला जातो आहे. आज किंवा उद्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होईल. मात्र पूर्वी कल्याण ग्रामीणमधून मी राजू पाटील आणि अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर करत आहे. येत्या २४ तारखेला मी दोघांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येत आहे”, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे मनसे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी डोंबिवलीतील कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा येथे होते. कल्याण ग्रामीणमधून मनसेकडून राजू पाटील हे एकमेव उमेदवार आहेत. त्यानंतर त्यांनी राजू पाटील आणि अविनाश जाधव यांच्या नावाची घोषणा केली.
लोकसभा निवडणुकीत मनसेने शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष या महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शविला असता. आगामी विधानसभेसाठी राज ठाकरे यांनी महायुतीसोबत न राहता स्वतंत्र भूमिका घेऊन आपला उमेदवार उभा करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे लोकसभेच्या काळात महायुतीबरोबर असणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेच्या उमेदवारांचा सामना आता भाजपा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर असणार आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मनसेचे आमदार राजू पाटील हे कल्याण लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार ठरले.कल्याण ग्रामीणमध्ये महायुतीला नकारात्मक वातावरण असुनही स्थानिक शिवसेना कार्यकर्ते, आमदार पाटील यांनी झटून केलेल्या कामामुळे खा. शिंदे यांचे या भागातील मताधिक्य वाढले होते.
महाआघाडीतून बाहेर पडल्याने राजू पाटील यांना कल्याण ग्रामीणमध्ये एकाकी लढावे लागणार आहे. या मतदारसंघातून राजू पाटील दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत ते दिवा भागाने दिलेल्या साथीने सहा ते सात हजाराच्या फरकाने निवडून आले होते.
राजू पाटील यांची लढत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे सुभाष भोईर आणि शिवसेनेचे राजेश मोरे यांच्याशी होणार आहे. कल्याण ग्रामीणचे प्रमुख नंदू परब हे मतदारसंघात भाजपकडून उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.