मनसे नेते राज ठाकरे यांचा शिवतीर्थावर पाडवा मेळावा (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये गुढीपाडव्याचा मोठा उत्साह दिसून येत आहे. राज्यभरातील महत्त्वाच्या शहरामध्ये शोभायात्रा देखील काढण्यात आली. पारंपारिक पद्धतीने हिंदू नव वर्षाचे स्वागत केले जात आहे. राजकीय वर्तुळामध्ये देखील मोठ्या उत्साहामध्ये नेते पाडवा साजरा करत आहेत. दरम्यान, मनसे नेते राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे. संपूर्ण राजकीय वर्तुळातून या मेळाव्याकडे लक्ष लागले आहे. यामध्ये आता राज ठाकरेंच्या मेळाव्याचा खास टीझर रिलीज करण्यात आला आहे.
मनसे अधिकृत या अकाऊंटवरुन राज ठाकरे यांच्या मेळाव्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. याची सुरुवातच राज ठाकरे यांच्या जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…अशा शब्दांनी खास करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्या मेळाव्याच्या अफाट गर्दीचे व्हिडिओ देखील यामध्ये दाखवण्यात आले आहेत. त्याचबरोबर लहानपणापासून अनेक पराभव पाहिले आहेत, असे देखील राज ठाकरेंच्या या टीझरमध्ये दाखवले आहे. त्याचबरोबर हिंदूत्ववादी विचार, पक्षाची पुढची भूमिका, औरंगजेबाची कबर, महाराष्ट्रातील राजकारणाची परिस्थिती, मनसेची पुढची भूमिका असे अनेक मुद्दे मांडले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर पाडवा अस्मितेचा…पाडवा महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा…असे म्हणत जबरदस्त टीझर मनसे पक्षाकडून रिलीज करण्यात आला आहे. राजकारणाचा चिखल आणि औरंगजेब कबरीत राहतो की बाहेर राहतो…असे देखील टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात सुरु असलेल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे भाष्य करणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे राज ठाकरेंची तोफ कोणत्या पक्षाच्या विरोधात धडधडणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
महाराष्ट्र धर्माची गुढी उभारायला उद्या शिवतीर्थावर भेटू ! pic.twitter.com/q2YKhImowJ
— Amit Thackeray (@amitrthackeray) March 29, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुंबईतील शिवतीर्थावर मनसे नेते राज ठाकरे यांचा हा गुढीपाडवा मेळावा संध्याकाळी होणार आहे. यासाठी मनसे नेते आणि कार्यकर्त्यांकडून मोठी तयार करण्यात आली आहे. लाखो लोकांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मोठे व्यासपीठ देखील उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर उंच असे भगवे झेंडे देखील लावण्यात आले आहेत. तसेच शिवमुद्रा आणि रेल्वे इंजिन असे मोठे चिन्ह लावण्यात आले आहेत.
#गुढीपाडवामेळावा२०२५ pic.twitter.com/Cgeg3T6EnR
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 30, 2025