ठाणे / स्नेहा काकडे – धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त ठाणे पूर्व अर्थात कोपरी येथे श्री अंबे मातेचे भव्य मिरवणुकीसह वाजत गाजत मोठ्या उत्साहात आगमन झाले.या भव्य दिव्य मिरवणुकीत टाळ मृदुंग घेतलेले वारकरी, कोळी नृत्यावर ताल धरणारे कोळी बांधव, स्थानिक आदिवासी समाजाचे वारली नृत्य, लेझीम पथक, भारत नाट्यम्, कथकली, गुजराती गरबा, पंजाबी भांगडा असे विविध नृत्याविष्कार, पारंपरिक काठ्या, तलवारी, दांडपट्टा यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करणारी तरुणाई असे सर्व असल्याने चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण होते. अजून एक मुख्य आकर्षण होते ते राम पंचायतनाचा देखावा होता.
मुख्य मंडपात अंबे मातेचे भक्तिभावे पूजन केले. उद्या देवीचे विधिवत पूजन करून प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल.या मंगलसमयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लताताई एकनाथ शिंदे, वृषाली श्रीकांत शिंदे (शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक), प्रवक्ते व खासदार नरेश म्हस्के साहेब, ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक राम रेपाळे, विभागप्रमुख एकनाथ भोईर, माजी नगरसेवक पवन कदम, योगेश जानकर, माजी परिवहन सभापती विलास जोशी, प्रकाश कोटवानी, रमाकांत मढवी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते, तमाम शिवसैनिक आणि ठाणेकर भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चैत्र नवरात्र आणि गुढीपाडव्यानिमित्ताने शोभा यात्रा देखील काढण्यात आली. गुढीपाडव्याच्या व नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने ठाण्यात कोपीनेश्वर मंदिर येथून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली . या शोभयात्रेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर यांच्या हस्ते मानाच्या पालखीचे पूजन करण्यात आले. शेकडो ठाणेकर नागरिक या शोभयात्रेत सहभागी झाले होते. या शोभयात्रेत आमदार संजय केळकर यांनी लिझिम खेळून केले नववर्षाचे स्वागत केले आहे. केळकरांनी लेझिम वर ताल धरून हिंदू नववर्षाचे स्वागत केले. वारकरी दिंडीमध्येही सहभागी झाले. चिंतामणी जांभळी नाका येथे शोभा यात्रेवर आमदार केळकर यांनी पुष्पवृष्टी केली व तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार घातला. यावेळी भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले उपस्थित होते.
या शोभयात्रेत सहभागी होत असताना संजय केळकर यांनी कोपीनेश्वराचे दर्शन घेतले वनागरिकांना गुढीपाडव्याच्या व हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.लोढा अमरा येथील नववर्ष शोभायात्रेत आ. केळकर यांनी सहभाग घेऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या . लोढा अमरा येथील नागरिकांनी एकत्रित हिंदू नववर्षाची स्वागत यात्रा काढली. आ. केळकर यांच्या हस्ते नारळ वाढवून शोभयात्रेला सुरुवात झाली. या शोभायात्रेत लाठीकाठी, लिझीम, वारकऱ्यांची दिंडी असे मराठं मोळे खेळ आयोजित केले होते. केळकर यांनी यात सहभाग घेतला व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.