मुंबईमध्य़े पावसानंतर परिस्थिती खराब झाल्यानंतर खासदार संजय राऊतांनी निशाणा साधला (फोटो - टीम नवराष्ट्र)
मुंबई : मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईमध्ये मागील दोन दिवसांमध्ये तुफान पाऊस झाला असून यामुळे मुंबईच्या व्यवस्थेचे अक्षरशः तीन-तेरा वाजले आहेत. रेल्वे लाईनवर पाणी साठल्यामुळे लोकल सेवा ठप्प झाली आहे. तर मेट्रो तीन या अंडर ग्राऊंड मेट्रोचे तर वाभाडे निघाले आहेत. रस्त्यांवर पाणीच पाणी साचले. यामुळे पहिल्याच पावसामध्ये मुंबईला तडाखा दिला. याच पार्श्वभूमीवर विरोधी नेत्यांनी सत्ताधारी नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच पावसामध्ये मुंबईच्या झालेल्या अवस्थेवरुन देखील त्यांनी निशाणा साधला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “काल मुंबई जो महापूर आला आताही जबाबदारी कोणाची आहे,एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री महानगरपालिका कोणाच्या ताब्यात आहे. काल अनेकांच्या स्वप्नात आनंद गेले आणि विचारलं एकनाथ कुठे आहे कुठे आहे, तो एकनाथ मुंबई ठाणे बुडालं, एकनाथ कुठे, एकनाथ कुठे तर लांगूनचालन करण्यात आहेत,” असा घणाघाती टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे संजय राऊत म्हणाले की, “हे शेअर बाजारमधील सगळे दलाल आहेत. त्यांना मुंबई जुगारावर लावायची आहे. भाजप हा व्यापाऱ्यांचा पक्ष आहे, हा शेठजींच्या पक्ष आहे. शेठजींनी या मुंबई महाराष्ट्राचा भवितव्य ठरवू नये. कसले आरोप प्रत्यारोप साडेतीन वर्ष सत्ता कोणाच्या ताब्यात आहे? काय झालं की पंडित नेहरू यांचे नाव काढतात महात्मा गांधी, मनमोहन सिंग दहा वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे ना साडेदहा वर्ष नरेंद्र मोदी यांच्या हातात आणि मिस्टर अमित शहा यांच्या हातात सत्ता आहे, साडेतीन वर्षापेक्षा जास्त मुंबईची सत्ता एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्याकडे आहे काय सांगत आहे?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“कालचा मेट्रोच्या कामांमध्ये या लोकांनी दीड हजार कोटीची दलाली खाल्ली. काल भुयारी रेल्वे बुडाली ही सुद्धा याच भ्रष्टाचारामुळे बुडाली आपण काल पाहिलेला आहे याला जबाबदार कोण आहे? त्यासंबंधी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. श्रेयवादसाठी घाईने उद्घाटन केले. आणि जर कोसळलं की आमच्यावरती खापरं फोडतात मेट्रोची काम कोणी केली आम्ही नाही केली हे सगळे गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आहेत सत्ताधारी कोण आहे? मुंबईकरांनी भविष्याचा योग्य निर्णय घावा,” असे आवाहन देखील खासदार संजय राऊत यांनी केले आहे.