खंडाळा बसस्थानकात अपघात(संग्रहित फोटो)
कुही : देवदर्शनावरून परतताना दुचाकीला टिप्परने कट मारला. यात दुचाकीस्वार महिला खाली पडली. यामध्ये दुचाकीस्वार महिलेच्या आईच्या डोक्यावरून टिप्पर गेल्याने तिचा मृत्यू झाला तर मुलीसह नात गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना कुही फाटा पुलाजवळील गतीरोधकाजवळ रविवारी (दि.25) दुपारी अडीचच्या सुमारास घडली.
मृतामध्ये जयश्री पुंडलिकराव लिखीतकर (वय 61) तर जखमींमध्ये तर रोशनी राहुल धोटे (वय 29) व अयांशी राहुल धोटे (वय 3, सर्व रा. रा. बांबुवन नगरी प्लॉट क्रमांक 205, बहादुरा, नागपूर) यांचा जखमीमध्ये समावेश आहे. घटनेच्या दिवशी रविवारी सकाळी दहा वाजता जयश्री, रोशनी व नात अयांशी हे आपल्या मोपोडवर ट्रिपल सिट आंभोरा येथे देवदर्शनासाठी गेले होते. त्यांच्यासोबत दुसऱ्या दुचाकीवर रोशनीची मामे-बहीण अंशुता प्रकाश गोधडे व पलक कृष्णा कोसे होत्या.
दरम्यान, परतताना रोशनी चालवत असलेल्या मोपेडला कुही फाटा पुलीयाजवळच्या गतिरोधकाजवळ समोरून येणाऱ्या टिप्परने रोशनीच्या मोपेडला कट मारला. त्यामुळे मोपेडवरून जयश्री, रोशनी व अयांशी रोडवर पडले. ज्या टिप्परने कट मारला. त्या टिप्परच्या चालकाच्या बाजूच्या मागचा टायर जयश्रीच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
पोलिसांकडून तपास सुरु
टिप्पर अंगावरून गेल्याने महिलेचा मृत्यू झाला तर मुलीसह नात गंभीर जखमी झाली आहे. या दुर्दैवी अशा अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास केला जात आहे.
खोपोलीजवळही भीषण अपघात
दुसऱ्या एका घटनेत, खोपोलीजवळील मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर शनिवारी 24 मे रोजी दुपारी चारच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. किलोमीटर 37 जवळ खोपोली फूड मॉलच्या अलीकडे मुंबई लेनवर एका अनियंत्रित ट्रेलरने सात वाहनांना जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 35 वर्षीय अश्विनी अक्षय हळदणकर आणि 17 वर्षीय श्रीया संतोष अवताडे यांचा समावेश आहे.