भारत पाकिस्तान युद्ध सुरु झाल्यानंतर सैन्यावर खासदार संजय राऊतांनी विश्वास व्यक्त केला आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अल्पावधीमध्ये लोकप्रिय ठरली. मात्र निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींचा महिन्याचा हप्ता 2100 रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ते पूर्ण करण्यात आले नाही. तसेच निवडणुकीनंतर अर्जाची पडताळणी करुन अनेक लाभार्थी महिलांना योजनेच्या निकषामध्ये बसत नसल्याचे कारण देऊन बाहेर काढले. त्यानंतर आता नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना केवळ 500 रुपये दिले जाणार आहेत. 8 लाख महिलांना 1500 पैकी केवळ 500 रुपये दिले जाणार आहेत. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच 8 लाख लाडक्या बहिणींना केवळ 500 रुपये देण्याच्या निर्णयावर टीका केली. खासदार राऊत म्हणाले की, “या राज्याची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर आहे, कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी कितीही मोठ्या वल्गना केल्या, आव आणला तरी हे राज्य चालवणं हे आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही. त्याचं कारण म्हणजे, गेल्या सा़डेतीन वर्षांमध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडलेली आहे, आर्थिक अराजकाच्या खाईत हे राज्य सापडलं आहे. ज्या लाडक्या बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली, त्या मतांची किंमत आता 500 वर आली आहे, उद्या ती शून्य होईल. याबाबत लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारले पाहिजेत,” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे खासदार संजय राऊत यांनी अर्थ खात्याबाबत महायुतीमध्ये नाराजी असल्याचा दावा केला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “मिस्टर अजित पवार हे जरी बोलत नसले तरी त्यांनाही त्या चिंतेंन ग्रासलेलं आहे, अमित शहांकडे एकनाथ शिंदे यांनी तक्रार केली, की अजित पवार आमच्या फाईली मंजूर करत नाहीत, आम्हाला निधि देत नाहीत. आम्हाला निधि देत नाहीत म्हणजे कोणाला? हा प्रश्न आमच्या सारख्या लोकांना पडतो, तुमचे जे 5-25 आमदार आहेत, गद्दार आहेत ते फक्त निधि आणि पैशांच्या ताकदीवर तुमच्यासोबत राहिले आहेत, या राज्याची तिजोरी लुटण्याची परवानगी त्यांना हवी आहे का?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “अमित शहांनी यावर एकनाथ शिंदेंना काय उत्तर दिलं , ते जर लोकांसमोर आलं तर या राज्याचं चित्र स्पष्ट होईल. आम्हाला निधी मिळत नाही हे टुमणं जेव्हा शिंदेंनी लावलं तेव्हा शहांनी दिलेलं उत्तर खूप महत्वाचं आहे. यापूर्वीही त्या दोघांमधला संवाद समोर आलेला आहे, मी आधी सांगितलेला संवाद नाकारलेला नाही. आमचीसुद्धा लोकं आहेत, महत्वाची लोकं आहेत,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.