महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डबघाईला; प्रत्येकाच्या डोक्यावर 'इतक्या' हजारांचे कर्ज (संग्रहित फोटो : विधानसभा)
सोलापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच समोर आला आहे. यामध्ये अनेक दिग्गज नेतेमंडळींना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यातच सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) नेते नरसय्या आडम (मास्तर) यांनी संसदीय राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे. सोलापूरमध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांचा सलग चौथ्यांदा पराभव झाला आहे. त्यानंतर आडम मास्तरांनी हा निर्णय घेतला आहे.
नरसय्या आडम हे आयुष्यभर सामाजिक चळवळीत काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, आता त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. यापुढे केवळ पक्षाचा म्हणून त्यांना ओळखले जाते. यापुढे केवळ पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निवडणुकीमध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आडम मास्तर यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव स्वीकारावा लागला. हा त्यांचा सलग चौथा पराभव आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे या मतदारसंघातून यावेळी महाविकास आघाडी आडम मास्तरांना संधी देईल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र काँग्रेसने येथून चेतन नरोटे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आडम यांनी काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवली. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र कोठे हे विजयी झाले आहेत. त्यामुळे आता आडम मास्तरांनी संसदीय राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे आणि माकपचे नेते नरसय्या आडम हे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जात होते. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आडम मास्तरांनी प्रणिती शिंदे यांचा प्रचार केला होता. त्याचा फायदा देखील शिंदे यांना झाला. प्रणिती शिंदे लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांच्या रिक्त असलेल्या विधानसभेच्या जागेवर आडम मास्तरांनी पुन्हा एका तयारी सुरू केली होती.
तसेच त्यासाठी माकपकडून ‘नोट भी दो, वोट भी दो’ अभियान राबवण्यात आले. मात्र, महाविकास आघाडीने नरसय्या आडम यांच्यासाठी ही जागा सोडली नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा या मतमदारसंघातून निवडणूक लढवली. यात त्यांचा पराभव झाला.
कोण आहेत नरसय्या आडम?
कॉम्रेड नरसय्या आडम हे काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेंचे कट्टर विरोधक मानले जात. माकपचे नेते म्हणून त्यांची ओळख असून त्यांना आडम मास्तर म्हणून देखील ओळखले जाते. सोलापूर शहरातून ते तीन वेळा विधानसभेवर निवडून आले होते. 1978, 1995 आणि 2004 च्या निवडणुकीत सोलापूरच्या जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला होता. मात्र, 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर सलग प्रणिती शिंदे यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे शिंदे कुटुंबीयांसोबत त्यांचे राजकीय विरोधाचे नाते तयार झाले होते. मात्र, या लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला होता.
लोकसभा निवडणुकीत मोदींवर टीका
सोलापूर लोकसभा मतदारसंघात 15 हजार घरांचे लोकार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी नरसय्या आडम मास्तरांनी मोठे कष्ट घेतले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत आडम मास्तर यांनी मोदींच्या विरोधात भूमिका घेतली होती.