अंजली दमानियांनी व्हायरल केले लक्ष्मण हाकेंचे 'ते' फोटो; हाकेंच्या आरोपांना दिलं उत्तर
मुंबई : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणावरुन जोरदार राजकारण तापले आहे. बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये वाल्किम कराड हा मास्टरमाईंड म्हणून समोर आला असून मात्र अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. तसेच वाल्मिक कराड याचे मंत्री धनंजय मुंडे सोबत संबंध असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. तसेच अनेक फोटो व व्हिडिओ देखील अंजली दमानिया यांनी शेअर केले आहेत. यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी टीका केली आहे.
संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घुणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये घटनेला 20 दिवस उलटून देखील आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. यामुळे विरोधकांनी सत्ताधारी महायुती व मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच आरोपी वाल्मिक कराड याचा अजित पवार गटाचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत संबंध असल्याचे देखील आरोप केले जात आहेत. या विरोधात शनिवारी (दि.28) सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन खोचक टोला लगावला आहे.
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सूरज चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, अंजली दमानिया स्व.संतोष देशमुख हत्त्या प्रकरणी अडथळे निर्माण करून पोलिसांची दिशाभूल करत आहेत.रिचार्ज वर चालणाऱ्या ताई नेमक्या कोणाला मदत करत आहेत.बीड पोलीस अधीक्षक यांना विनंती आहे अंजली दमानिया यांना या प्रकरणापासून दूर ठेवावे.रिचार्ज वाल्या ताईची लढाई स्व.संतोष देशमुख न्याय मिळवून देण्यापेक्षा प्रसिद्धीसाठी चालू आहे. अंजली दमानिया यांनी लक्षात ठेवाव सरकार गुन्हेगारांना सोडणार नाही, असा विश्वास अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
अंजली दमानिया स्व.संतोष देशमुख हत्त्या प्रकरणी अडथळे निर्माण करून पोलिसांची दिशाभूल करत आहेत.रिचार्ज वर चालणाऱ्या ताई नेमक्या कोणाला मदत करत आहेत.बीड पोलीस अधीक्षक यांना विनंती आहे अंजली दमानिया यांना या प्रकरणापासून दूर ठेवावे.रिचार्ज वाल्या ताईची लढाई स्व.संतोष देशमुख न्याय…
— Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) December 30, 2024
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अंजली दमानिया यांचे गंभीर आरोप
बीड हत्या प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अंजली दमानिया यांनी अनेक सोशल मीडिया पोस्ट करुन धक्कादायक दावे केले आहेत. यापूर्वी अंजली दमानिया यांनी आरोपी वाल्मिक कराड आणि बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे सोबत असलेले फोटो शेअर केले होते. त्याचबरोबर बीडमधील हजाराहून अधिक परवानाधारक पिस्तुलधारक असल्याची माहिती देखील त्यांनी समोर आणली. याचबरोबर धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराडसोबत अर्थिक संबंध असल्याचे देखील अंजली दमानिया यांनी म्हटले होते. त्याचबरोबर बीड हत्या प्रकरणातील तीन आरोपांची हत्या करण्यात आल्याचा गंभीर दावा अंजली दमानिया यांनी केला होता. त्याचबरोबर त्या तिघांचे मृतदेह कर्नाटक सीमेवर आढळल्याचा कॉल अज्ञातांनी आपल्याला केल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला होता. त्यानंतर गुन्हे शाखेने याची शहानिशा केली होती मात्र त्यात प्रथमदर्शनी काहीही तथ्य आढलेले नाही. त्यामुळे अंजली दमानिया बीड हत्या प्रकरणामध्ये दिशाभूल करत असल्याचा आरोप सूरज चव्हाण यांनी केला आहे.