Operation Tiger : ठाकरेंचे फुटीर खासदार मुंबईत दाखल, थोड्याच वेळात करणार शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश
Operation Tiger : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालवलेले ऑपरेशन टायगर यशस्वी झाले आहे. शिवसेनेच्या सहा खासदाराना फोडण्यात त्यांना यश आले असून आज (सोमवार, 22 जून) हे सहाही खासदार अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा करणार आहेत. यासाठीच आज खासदारांचे आज मुंबईत आगमन झाले असून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील नंदनवन या निवासस्थानी पोहोचणार आहेत.
Y प्लस सुरक्षेसह हे खासदार उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत. खासदार संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर आज दुपारी दिड वाजता विशेष विमानाने मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. यानंतर ते आपल्या खाजगी वाहनाने नानादानवांच्या दिशेने निघतील. ओमराजे निंबाळकर धाराशिवमधून मुंबईच्या दिशेने पोहोचतील तर संजय दिना पाटील हे मुबईतच असल्याने तेदेखील थोड्याच वेळात पोहोचतील.
फुटीर खासदार मुंबईत आल्यानंतर शिवसेना थगकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून चांगलाच निउष्ण साधला आहे. ते म्हणाले, “50 50 कोटीला विकले गेलेले चार खासदार मुंबई विमानतळावर उतरले आणि भेदरलेल्या नजरेने शशस्त्र पोलिस गराड्यात बाहेर पडले. ये जिना भी क्या जिना है लल्लू? चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली आहे! ह्यांची पुढील पिढी सांगेल. मेरा बाप गद्दार था. मेरा पती गद्दार था. मेरा नाना गद्दार था! जय महाराष्ट्र!” असे म्हणत त्यांनी या खासदारांवर जोरदार टीकास्त्र सोडले.
50 50 कोटीला विकले गेलेले चार खासदार मुंबई विमानतळावर उतरले
आणि भेदरलेल्या नजरेने
शशस्त्र पोलिस गराड्यात बाहेर पडले
ये जिना भी क्या जिना है लल्लू?
चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली आहे!
ह्यांची पुढील पिढी सांगेल
मेरा बाप गद्दार था
मेरा पती गद्दार था
मेरा नाना… — Sanjay Raut (@rautsanjay61) June 22, 2026
नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज (22 जून 2026) जाहीर झाला असून भारतीय जनता पक्षाचे (BJP) आणि महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी दणदणीत विजय मिळवला. मतदान केलेल्या ४५२ सदस्यांपैकी ४५१ जणांना ३३९ मते मिळवून दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि महाविकास आघाडीचे (एमव्हीए) अपक्ष उमेदवार आणि बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्ण नागेश पाटील अष्टिकर यांना केवळ ८४ मतांवर समाधान मानावे लागले.
निकाल जाहीर होताच, ठाकरे गटाने एक मोठे पाऊल उचलले आणि कृष्ण पाटील अष्टिकर यांना पक्षातून काढून टाकले. कृष्णा नागेश पाटील (अष्टेकर ) यांची पक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यापूर्वी, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अष्टिकर यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. बंडखोरी होऊनही, कृष्णा नागेश पाटील अष्टिकर यांनी महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने निवडणूक लढवली. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता निकाल स्पष्ट झाला असून, अष्टिकर यांचा पराभव झाला आहे.






