Bihar Election 2025 : पंतप्रधान मोदी आज घेणार प्रचारसभा; समस्तीपूरसह बेगूसराय येथे जनतेला संबोधित करणार (फोटो- ani)
पटना : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसह सर्वच स्थानिक पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आता बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा घेणार आहेत. पंतप्रधान मोदी हे शुक्रवारी (दि.२४) समस्तीपूर येथून त्यांच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात करतील. ते दोन मोठ्या सार्वजनिक सभांना संबोधित करतील, अशी माहिती दिली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ११ वाजता कर्पूरी ग्रामला भेट देतील आणि भारतरत्न दिवंगत कर्पूरी ठाकूर यांना पुष्पांजली अर्पण करतील. त्यानंतर, ते त्यांच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात करतील. पंतप्रधान मोदी शुक्रवारी समस्तीपूरमध्ये दुपारी १२:१५ वाजता आणि बेगुसरायमध्ये दुपारी २ वाजता दोन मोठ्या सार्वजनिक सभांना संबोधित करतील. या सभांदरम्यान, पंतप्रधान मोदी एनडीए उमेदवारांसाठी बिहारमधील जनतेकडून पाठिंबा मागतील आणि विरोधकांना एक मजबूत संदेश देखील देऊ शकतात.
हेदेखील वाचा : Gopinath Munde heir: दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा खरा वारसदार कोण? पंकजा अन् धनंजयवरुन नेत्यांमध्ये रंगला कलगीतुरा
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ कार्यक्रमाद्वारे बिहारमधील युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. व्हर्च्युअल संवादादरम्यान, पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. त्यांच्या युतीला ‘लाठबंधन’ (जबरदस्ती युती) म्हटले आणि बिहारच्या तरुणांची काळजी नसलेल्या या विरोधी पक्षांसाठी स्वार्थ सर्वोच्च असल्याचा आरोप केला.
एनडीए सरकारने बिहारला जंगलराजमधून काढले बाहेर
एनडीए सरकारने बिहारला जंगलराजच्या अंधारातून बाहेर काढून विकासाच्या नवीन प्रकाशात आणले आहे. ‘या माओवादी दहशतीने शाळा, महाविद्यालये किंवा रुग्णालये उघडू दिली नाहीत, उलट विद्यमान रुग्णालये उद्ध्वस्त केली. त्यांनी उद्योगांना येण्यापासून रोखले. बिहारला यातून बाहेर काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत आहे, परंतु आम्ही ते करत आहोत. २०१४ पासून आम्ही खूप मेहनत घेतली आहे’.
हेदेखील वाचा : Bihar Election 2025: ‘एनडीए’चा अंतर्गत वाद मिटला? बिहार विधानसभेसाठी ‘या’ दिवशी पहिली यादी येणार? वाचाच…






