मुख्यमंत्री–महसूल मंत्र्यांकडून संरक्षण? पुणे जमीन गैरव्यवहारावर अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांचा खळबळजनक दावा
विजय कुंभार म्हणाले की, यापूर्वी पार्थ पवारांच्या सहीचे पत्र दिले होते , त्यावेळी ते माझ्या सहीचे पत्र नसल्याचे त्यांनी सांगितले होते. पण २५ मे २०२५ रोजी हा व्यवहार झाला होता. ही सर्व कागदपत्र सरकार दरबारी पडली आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांपासून हा घोटाळा सुरू आहे. एकाच नोटरी वकिलाकडून ही कागदपत्रे बनवून घेतली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील या व्यवहारांची माहिती होती. इतकेच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडून या प्रकरणात प्रोटेक्ट केलं जात असल्याचा खळबळजनक दावा विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांनी केला.
“काँग्रेसमुक्त नगरपालिका तयार…”; भाजपच्या अभूतपूर्व यशावर Devendra Fadnavis यांनी विरोधकांना डिवचलं
पुण्याील जमीन घोटाळा प्रकरणमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, पण राजकीय दबावामुळे त्यांच्यावर अजूनही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. असा आरोपही कुंभार यांनी केला. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी (Anjali Damania) यांनीदेखील पुन्हा काही धक्कादायक दावे केले आहेत, त्याचवेळी अजित पवार यांच्या आज राजीनामा घेतला नाही तर, असा इशाराही दिला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या म्हणाल्या की, ही पॉवर ऑफ अॅटॉर्नी असून त्यामध्ये मुंढव्याची जमीन नमूद आहे. या दस्तऐवजाच्या प्रत्येक पानावर पार्थ पवार यांची सही असून त्यांचा फोटोही आहे. ही पॉवर ऑफ अॅटॉर्नी सन 2021 मधील असून याच जमिनींसंदर्भात करण्यात आली आहे.अॅडव्होकेट तृप्ता ठाकूर यांनी हे सर्व कागदपत्रे पाठवली असून, दिग्विजय सिंह आणि शीतल तेजवानी यांच्या वकिलांनीही ही माहिती पुरवली आहे. या कागदपत्रांमध्ये चॅट्सचाही समावेश असून, संतोष हिंगणे आणि तृप्ता ठाकूर यांच्यातील तसेच अजित पवारांचे पीए आणि तृप्ता ठाकूर यांच्यातील चॅटिंगही असल्याचा दावा दमानिया यांनी केला. तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे (EOW) अधिकारी वाघमारे यांचा मोबाईल क्रमांकही या कागदपत्रांमध्ये देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बाप-लेकीची झाली शेवटची भेट! शाळेत सोडायला गेले अन् काळाने केला घाला, हृदयद्रावक VIDEO VIRAL
हे सर्व पुरावे पोलिसांसमोर सादर करण्यात आले असतानाही अद्याप पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही, असा आरोप त्यांनी केला. जर आजच अजित पवार यांचा राजीनामा घेतला गेला नाही, तर उद्या पुण्यात जाऊन त्यांच्या नावाने तक्रार दाखल करू, असा इशाराही अंजली दमानिया यांनी दिला. शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यात हा व्यवहार झाला असून, या प्रकरणात तीन ओएसडी सहभागी असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
अंजली दमानिया म्हणाल्या, शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांनाच अडकवलं जात आहे. पण पार्थ पवार यांच्यावर कोणतीही कारवाई कऱण्यात आली नाही. त्यामुळे कदाचित तृप्ता ठाकूर यांनी हे आम्हाला पाठवलं असाव. तो पत्ता तृप्ता ठाकूर यांनीच कलेक्टरला पाठवला असवा. आम्ही जी याचिका दाखल करणार आहोत त्याला सर्वात पहिले राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. पण अजित पवार हेदेखील काही संत नाहीत. अजित पवारांचे 3 अधिकारीदेखील यात सामील आहेत. राम चौबे, संतोष हिंगणे, विकास पाटील यां अधिकाऱ्यांशी केलेलं चॅटिंगदेखील आमच्याकडे असल्याचा दावाही अंजली दमानिया यांनी केला आहे.






