ऑस्ट्रेलियाकडून आयर्लंड 67 धावांनी पराभू(फोटो-सोशल मीडिया)
AUS vs IRE, T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज १४ वा सामना आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने आयर्लंडचा ६७ धावांनी पराभूत केले आहे. या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना मार्कस स्टोइनिसच्या खेळीच्या जोरावर ६ गडी गमावून १८१ धावा केल्या होत्या आणि आयर्लंडसमऑर १८२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु, आयर्लंड संघ लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही आणि परिणामी संघ ११५ धावांतच गारद झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा नायक नाथन एलिस ठरला आहे. त्याने शानदार गोलंदाजी करत ४ विकेट चटकावल्या.
हेही वाचा : T20 World Cup 2026 : श्रीलंकेला मोठा झटका! टी२० विश्वचषकातून वानिंदू हसरंगा बाहेर, ‘या’ खेळाडूची लागली वर्णी
ग्रुप बी चा हा सामना बुधवार, ११ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला गेला. ऑस्ट्रेलियाचा स्पर्धेतील(आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ )पहिला सामना होता. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघाला आक्रमक सुरुवात देण्यात अपयश आले. तरी देखील जोश इंग्लिस ३७ धावा, मार्कस स्टोइनिस ४५ धावांच्या योगदानाने ऑस्ट्रेलियाने आयर्लंडसमोर १८२ धावांचे लक्ष्य उभे केले. आयर्लंडकडून मार्क अडायरने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आयर्लंडला पहिल्याच चेंडूवर झटका बसला. कर्णधार पॉल स्टर्लिंग हाडांच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. सुरुवातीच्या या घडामोडीचा फलंदाजीवर स्पष्ट परिणाम झाला असल्याचे दिसत होते.
Australia begin their #T20WorldCup campaign with a dominant victory over Ireland 🔥 📝: https://t.co/JAY98fldkw pic.twitter.com/ACelQ3NsCH — ICC (@ICC) February 11, 2026
आयर्लंडसाठी, यष्टिरक्षक-फलंदाज लॉर्कन टकरने २४ धावा फटकावल्या आणि जॉर्ज डॉकरेलने ४१ धावांची खेळी करत संघाला सावरत झुंज देण्याचा प्रयत्न केला. परंतु ते संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाच्या विजयामध्ये गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे दिसून आले. अॅडम झम्पाने चार षटकांत २३ धावा देत चार बळी घेतले, तर नाथन एलिसनेही चार बळी घेतले, ज्यामुळे आयर्लंडची फलंदाजी कोलमडली आणि संपूर्ण आयर्लंड संघ ११५ धावांवर सर्वबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाने ६७ धावांनी सामना आपल्या ताब्यात टाकला.






