Pune ZP Budget 2026: पुणे जिल्हा परिषदेचे ३३३ कोटींचे पुरवणी अंदाजपत्रक मंजूर; ३२ कोटींची वाढ
पुणे जिल्हा परिषद गटनेते तथा सदस्य श्रीमंत ढोले यांनी यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागण्यांची दखल घेत प्रशासनाने या दोन महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी दिली.
नवीन निर्णयानुसार कर्करोग, हृदयविकार, लिव्हर अथवा किडनी प्रत्यारोपण यांसारख्या गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मिळणारी आर्थिक मदत आता २५ हजार रुपये असेल. वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय ग्रामीण भागातील रुग्णांसाठी मोठा आधार ठरणार आहे.
याशिवाय, परराज्यातील नामांकित रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत मंजूर निधी संबंधित रुग्णालयांच्या बँक खात्यात थेट वर्ग (डायरेक्ट फंड ट्रान्सफर) करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची आर्थिक तसेच प्रशासकीय धावपळ कमी होणार आहे.
या निर्णयाबद्दल श्रीमंत ढोले यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी राम हंकारे यांचे आभार मानले.
“ग्रामीण भागातील एकही गरीब रुग्ण पैशांअभावी उपचारांपासून वंचित राहू नये, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता. प्रशासनाने या मागणीचे गांभीर्य ओळखून सकारात्मक निर्णय घेतल्याने हजारो कुटुंबांना संकटकाळात मोठा आधार मिळेल,” अशी प्रतिक्रिया श्रीमंत ढोले यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेकडील वैद्यकीय मदतीत झालेली वाढ आणि परराज्यातील उपचारांसाठी थेट निधी वर्ग करण्याचा निर्णय ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी निश्चितच दिलासादायक ठरणार आहे.






